पतीला पोटगी देण्याचा पत्नीला आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2016 09:45 PM2016-10-13T21:45:58+5:302016-10-13T21:45:58+5:30

किरकोळ चुकीबद्दल घरकाम करणा-या नव-यास न नांदवता हकलून देणाºया मुख्याध्यापक पत्नीने पीडित नवºयास दरमहा दोन हजार रुपयांची अंतरिम पोटगी

Order to give her husband a gift | पतीला पोटगी देण्याचा पत्नीला आदेश

पतीला पोटगी देण्याचा पत्नीला आदेश

Next
>ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 13 - किरकोळ चुकीबद्दल घरकाम करणा-या नव-यास न नांदवता हकलून देणाºया मुख्याध्यापक पत्नीने पीडित नवºयास दरमहा दोन हजार रुपयांची अंतरिम पोटगी द्यावी, असा महत्त्वपूर्ण आदेश दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) व्ही. पी. पाटील यांनी दिला. सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातील हा पहिलाच न्यायालयीन निकाल मानला जातो, असे विधिज्ञांनी स्पष्ट केले.
अजय (नाव बदल) व संगीता (नाव बदल) यांचा विवाह २०१४ साली झाला होता. संगीता ही उच्चशिक्षा विभूषित तर अजय हा अल्पशिक्षित आहे. अजयची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. एका विवाह मेळाव्यात दोघांची ओळख झाली होती. अजय हा सांगली जिल्ह्यात राहणारा तर संगीता ही सोलापूर जिल्ह्यात राहणारी. अजयने संगीताला त्याच्या संपूर्ण परिस्थितीची कल्पना दिली होती. संगीताने अजयबरोबर लग्न करण्यास संमती दिली. परंतु तिने अशी अट घातली की, ती नोकरी करते, त्यामुळे ती अजयच्या गावी नांदण्यास येऊ शकत नाही. अजय यानेच तिच्या घरी नांदण्यास यावे. शिवाय घरातील सर्व कामे अजय यानेच करावे लागतील. गरिबी स्थितीमुळे अजयने या दुनियादारीच्या उलट अटी मान्य केल्या. 
२४ नोव्हेंबर २००४ रोजी सांगली जिल्हा, जत तालुक्यातील गुड्डापूरच्या दानम्मादेवी देवस्थान येथे दोघांचा विवाह झाला. ठरल्याप्रमाणे अजय संगीताच्या घरी नांदायला आला. संगीताने घातलेल्या सर्व अटींचे अजय पालन करीत होता. घरातील सर्व कामे म्हणजे स्वयंपाक, धुणे, भांडी घासणे अजय करायचा. संगीता ही केवळ सकाळी झोपेतून उठून तयार होऊन नोकरीस जात होती. जाताना अजय तिला जेवणाचा डबा तयार करुन देत होता. झाडलोट करण्यापासून ते संगीताचे पाय चेपण्याचे कामदेखील अजय करीत असे. संगीता रागीट स्वभावाची होती. तिचे भाऊ पोलीस खात्यात नोकरीस होते. एके दिवशी घरात अजयच्या हातून दूध सांडले. एवढ्याच कारणावरुन संगीताने रागाच्या भरात अजयला शिवीगाळ व मारहाण केली आणि घरातून हकलून दिले. अजयने संगीताच्या पाया पडून माफी मागितली तरीदेखील संगीताने अजयला दया न दाखवता हकलून दिले. 
संगीताने आपणास घरात घ्यावे व नांदवावे म्हणून अजयने पायावर लोटांगण घालून याचना केली. परंतु संगीताने त्याला नांदवण्यास नकार दिला. अजय हा अशिक्षित असून, तो काही कमवू शकत नाही, त्यामुळे संगीताने त्याला घरातून हकलून दिल्यापासून तो हलाखीचे जीवन जगतो. त्यामुळे अखेर त्याने पत्नी संगीताविरुद्ध सोलापूरच्या दिवाणी न्यायालयात हिंदू विवाह कलम ९ व १४ अन्वये संगीता हिने आपणास नांदवण्यासाठी घरात घ्यावे व प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत पोटगी देण्याबद्दल आदेश व्हावेत म्हणून अ‍ॅड. जयदीप माने, अ‍ॅड. मनोज गिरी यांच्यामार्फत अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणात अर्जदार पतीच्या वतीने अ‍ॅड. जयदीप माने, अ‍ॅड. मनोज गिरी  काम पाहत आहेत. 
 
...असा आहे आदेश
या प्रकरणाची सुनावणी दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) व्ही. पी. पाटील यांच्यासमोर झाली. अंतरिम पोटगी अर्जाच्या सुनावणीदरम्यान अ‍ॅड. जयदीप माने यांनी न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिले की, अर्जदार पतीला काहीही कामधंदा नाही. आजारपणामुळे तो स्वत:चे पालनपोषण करण्यास असमर्थ आहे. न्यायालयासमोर हजर करण्यात आलेल्या पगारपत्रकावरुन पत्नीस भरपूर पगार आहे हे सिद्ध होते. त्यामुळे पतीला खटल्याचा निकाल लागेपर्यंत अंतरित पोटगी मिळणे जरुर आहे. न्यायालयाने यावर पत्नीने पतीला अर्ज दाखल झाल्याच्या तारखेपासून २ हजार रुपये पोटगी म्हणून द्यावेत, असे आदेश दिले.

Web Title: Order to give her husband a gift

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.