सतेज पाटील यांच्याविरुद्ध तपास करण्याचे आदेश
By admin | Published: October 29, 2014 02:08 AM2014-10-29T02:08:12+5:302014-10-29T02:08:12+5:30
माजी गृहराज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्यासह त्यांच्या नऊ साथीदारांविरोधात मिळालेल्या खासगी तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन चौकशी करण्याचे आदेश दिले.
Next
कोल्हापूर : माजी गृहराज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्यासह त्यांच्या नऊ साथीदारांविरोधात मिळालेल्या खासगी तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन चौकशी करण्याचे आदेश मंगळवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. डी. डांगे यांनी राजारामपुरी पोलिसांना दिले.
विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रियेदरम्यान आमदार महादेवराव महाडिक यांचे कार्यकर्ते व माजी महापौर नंदकुमार वळंजू यांच्या घरात पाटील व त्यांच्या साथीदारांनी घुसून हल्ला केल्याची तक्रार न्यायालयाकडे करण्यात आली होती.
तक्रारीमध्ये दरोडा टाकणो, खुनाचा प्रयत्न व गंभीर स्वरूपाच्या जखमा करणो आदी कलमांखाली मोडणा:या कृत्यांची नोंद आहे. आरोप करण्यात आलेली कृत्ये दखलपात्र असल्याने या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. ही माहिती तक्रारदार वळंजू व अॅड. शिवाजीराव राणो यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार अमल महाडिक यांचा प्रचार वळंजू करीत होते. मतदानादिवशी (15 ऑक्टोबरला) वळंजू हे मतदारांना पैसे वाटत असल्याच्या संशयावरून काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील यांनी वळंजू यांच्या दोघा कार्यकत्र्याना त्यांच्या राजेंद्रनगर येथील घरासमोर पकडले. त्यावरुन त्यांच्यात वाद झाला. पाटील व त्यांच्या सहका:यांनी घरात घुसून मारहाण केल्याची फिर्याद देण्यासाठी त्याचदिवशी वळंजू राजारामपुरी पोलिसांकडे गेले होते. परंतु पोलिसांनी त्यांची फिर्याद घेतली नाही.
दुस:या दिवशी खासदार धनंजय महाडिक यांनीही तक्रार दाखल करून घ्यावी यासाठी पोलीस ठाण्यात ठिय्या दिला होता. परंतु तक्रार दाखल करून न घेतल्याने वळंजू यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डांगे यांच्याकडे संशयित सतेज पाटील यांच्यासह इतरांविरोधात भादंवि कलम 394, 3क्7, 326, 143, 147, 148, 149 आणि बी. पी. अॅक्ट कलम 135 प्रमाणो दरोडा टाकणो, खुनाचा प्रयत्न व गंभीर स्वरूपाच्या जखमा करणो अशी तक्रार 18 ऑक्टोबर रोजी दिली. (प्रतिनिधी)