लुटारु ठेकेदारांच्या चौकशीचे आदेश

By admin | Published: July 23, 2016 03:11 AM2016-07-23T03:11:57+5:302016-07-23T03:11:57+5:30

वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या ठेकेदारांकडून मागील पाच वर्षांत बोगस कर्मचारी दाखवून बेकायदेशीरपणे कोट्यवधी रुपयांची लूट केल्याप्रकरणी सखोल चौकशी

Order for the investigation of the robber contractor | लुटारु ठेकेदारांच्या चौकशीचे आदेश

लुटारु ठेकेदारांच्या चौकशीचे आदेश

Next


वसई/पारोळ : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या ठेकेदारांकडून मागील पाच वर्षांत बोगस कर्मचारी दाखवून बेकायदेशीरपणे कोट्यवधी रुपयांची लूट केल्याप्रकरणी सखोल चौकशी करून शासनास चार आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी पालघर यांना दिले असल्याची माहिती गुरुवारी विधानपरिषदेत तारांकित प्रश्नाला उत्तरात दिली.
महानगरपालिकेच्या ‘ड’ प्रभाग समित्यांसाठी २२ ठेकेदारांकडून मागील ५ वर्षांच्या कालावधीत बोगस कर्मचारी दाखवून महानगरपालिकेची सुमारे २०० ते २५० कोटीची लूट करण्यात आली. या प्रकरणी शिवसेनेचे नगरसेवक धनंजय गावडे यांनी अशा ठेकेदारांवर कठोर कारवाईची मागणी प्रशासनाकडे केली होती. तसेच विविध कामांमध्ये ठेकेदारांकडून होत असलेल्या अनियमिततेबाबत व गैरकारभाराबाबत स्थायी समितीच्या बैठकीस गावडे यांनी हा विषय उपस्थित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यामुळे आयुक्त सतीश लोखंडे यांनी आकृतीबंधापेक्षा अतिरिक्त कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला. परंतु, मागील ५ वर्षात ज्या ठेकेदारांनी बेकायदेशीरपणे कोट्यवधीची लूट केली त्यांच्याकडून पैसे वसूल करून फौजदारी गुन्हे दाखल करण्यासंदर्भात पुढे काय कारवाई होणार, असा प्रश्न गावड ेयांनी उपस्थित केला होता. (वार्ताहर)
>तब्बल पाच वर्षे चालली बोगसगिरी
युनिव्हर्सल एंटरप्रायजेस, क्लासिक एंटरप्रायजेस, दिव्या एंटरप्रायजेस, आकाश एंटरप्रायजेस, गजानन एंटरप्रायजेस, ओम साई एंटरप्रायजेस, मधुरा एंटरप्रायजेस व अथर्व एंटरप्रायजेस इत्यादी ठेकेदारांचा यामध्ये सहभाग असून या व अशा अनेक ठेकेदारांकडून ५ वर्षांत बोगस कर्मचारी दाखवून कोट्यवधी रुपयांची लूट करण्यात आली. हे प्रकरण मुंबईत सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात या भ्रष्टाचाराचे पडसाद उमटले.
>अहवालाची डेडलाइन ठरली : विधान परिषद सदस्यांनी या प्रकरणाबाबत तारांकित प्रश्न विधानपरिषदेत उपस्थित करून दोषी ठेकेदारांकडून पैसे वसूल करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करून चार महिन्यांत अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

Web Title: Order for the investigation of the robber contractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.