अक्कलकोटमध्ये जमीन गैरव्यवहारप्रकरणी ५ कोटी ३५ लाखांची रक्कम भरून घेण्याचा आदेश

By admin | Published: July 4, 2016 10:24 PM2016-07-04T22:24:58+5:302016-07-04T22:24:58+5:30

५ कोटी ३५ लाखांची रक्कम भरून घेण्याचा आदेश अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण देवरे यांनी प्रांताधिकाऱ्यांना दिला आहे.

An order to pay the amount of Rs 5 crore 35 lakh for the land deal in Akkalkot | अक्कलकोटमध्ये जमीन गैरव्यवहारप्रकरणी ५ कोटी ३५ लाखांची रक्कम भरून घेण्याचा आदेश

अक्कलकोटमध्ये जमीन गैरव्यवहारप्रकरणी ५ कोटी ३५ लाखांची रक्कम भरून घेण्याचा आदेश

Next

ऑनलाइन लोकमत

सोलापूर, दि. 4-  अक्कलकोट शहरालगतची गट नं ६३२ क्षेत्र ही ३५ एकर नोकर इमान या वतनाची जमीन शासनाच्या मंजुरीशिवाय विक्री झाल्याप्रकरणी सध्याचे मालक विलास कोरे, महमद शुकूर बेपारी, मुकसिनी कामले, शोएब कामले, ऐजाज मुतवली यांच्याकडून ५ कोटी ३५ लाखांची रक्कम भरून घेण्याचा आदेश अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण देवरे यांनी प्रांताधिकाऱ्यांना दिला आहे.
याबाबत महापालिकेचे नगरसेवक नाना काळे यांनी तक्रार केली होती़ गेल्या तीन-चार वर्षापासून ही प्रकरण चर्चेत होते़ देवरे यांनी निकाल देऊन बाजारभावानुसार रक्कम भरावी असे आदेश दिले आहेत़ वरील जमीन ही शर्तीची असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय विक्री करता येत नाही़ सदरची जमीन ही कसबे अक्कलकोट गट क्रमांक ६३२ असून १३़७३ हेक्टर ऐवढे क्षेत्र आहे़ गाव नोकर वतनाची असून १० डिसेंबर १९८० रोजी प्रांताधिकाऱ्यांनी बॉम्बे सर्व्हीस इनाम युजफूल कम्युनिटी अ‍ॅबोलशन अ‍ॅक्ट १९५३ चे कलम ५(२) अन्वये इप्तेकार करीम खतीब यांना मूळ वतनदार म्हणून जमीन परत केलेली आहे़ ५ जून १९८१ रोजी प्रांताधिकाऱ्यांनी नविन शर्त म्हणून नोंद केली़ ही जागा हस्तांतरण न करता येणारी किंवा वाटप न करता येणारी असून वापरात बदल करावयाचा झाल्यास बाजार मुल्याच्या ५० टक्के व साऱ्याच्या २० पट रक्कम भरावी लागेल असे नमूद आहे़ मात्र ११ आॅक्टोबर १९९४ च्या खरेदीदस्त पाहता शर्तभंग झाल्याचे दिसून येते़ याबाबत नाना काळे यांनी या जमीनीचा व्यवहार करु नये़ अटी आणि शर्तीचा भंग केल्यामुळे ही जमीन शासनाकडे जमा करुन घेण्याची मागणी केली होती़ त्यानुसार अक्कलकोट तहसीलदारांनी आपला अहवाल प्रांताधिकाऱ्यांकडे १५ एप्रिल २०१५ रोजी दिला होता़ प्रांताकडून हे प्रकरण अप्पर जिल्हाधिकारी देवरे यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी १५ जून २०१६ रोजी आदेश देऊन या प्रकरणी ५ कोटी ३५ लाख १२ हजार एवढी रक्कम शासन तिजोरीत भरुन अहवाल सादर करावा असा आदेश प्रांतांधिकाऱ्यांना दिला आहे़
कोरे, बेपारी,कामले, मुतवली असे पाच मालक सध्याअसून त्यांनी ३० एप्रिल २०१३ रोजी ५ लाख ७३ हजार ५०० रुपये शासनाकडे जमा केले आहेत़ ही रक्कम शासन आदेशानुसार नाही त्यामुळे आजच्या बाजारभावाप्रमाणे जी किंमत होते त्या किंमतीच्या ७५ टक्के रकमेतून ५ लाख ७३ हजार ५०० एवढी रक्कम वगळून उर्वरीत ५ कोटी ३५ लाख १२ हजार इतकी रक्कम शासन तिजोरीत भरुन जमीन नियमित करुन घ्याचवी असे म्हटले आहे़ सध्या या जमीनीचा भाव ७ कोटी २१ लाख असल्याचे अहवालात नमूद आहे़
मी बऱ्याच वर्षापासून पाठपुरावा करत होतो़ सदरची जमीन शासन जमा करण्याची माझी मागणी होती़ बऱ्याच दिवसानंतर आणि माझ्या पाठपुराव्यामुळे ५ कोटी ३५ लाख भरण्याचे आदेश काढल्याचे नाना काळे यांनी सांगितले.

अक्कलकोट शहरालगत ही जमीन असून तिचा शर्तभंग झाल्याचा अहवाल तहसीलदारांकडून प्राप्त झाला होता़ एनए झालेली ही जमीन असून सध्याच्या बाजारभावाच्या ७५ टक्के रक्कम भरुन व्यवहार नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे़ तसा आदेश प्रांताधिकाऱ्यांना दिला आहे़ पैसे न भरल्यास सदर जमीन शासन जमा होईल.
प्रवीण देवरे,
अपर जिल्हाधिकारी

Web Title: An order to pay the amount of Rs 5 crore 35 lakh for the land deal in Akkalkot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.