बबनराव पाचपुतेंच्या साईकृपा साखर कारखान्याच्या जप्तीचा आदेश
By admin | Published: July 26, 2016 04:34 PM2016-07-26T16:34:01+5:302016-07-26T16:34:01+5:30
माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दणका दिला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २६ - माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दणका दिला आहे. पाचपुते यांचा हिरडगावातील साईकृपा साखर कारखाना जप्त करण्याचा न्यायालयाने आदेश दिला आहे. शेतक-यांची उसाची ३८ कोटींची एफआरपीची रक्कम थकवल्याबद्दल ही जप्तीची कारवाई होणार आहे.
परांडा, जामखेडा, करमाळा आणि फलटण येथील शेतक-यांच्यावतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाचपुते यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. शेतक-यांची थकवलेली रक्कम देण्याचे आश्वासन साईकृपा साखर कारखान्याने दिले होते.
मात्र हे आश्वासन न पाळल्याने न्यायालयाने कारखान्याच्या जप्तीचा आदेश दिला आहे. बबनराव पाचपुते काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारमध्ये मंत्री होते. निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.