‘नवीन’ स्वातंत्र्यसैनिकांच्या पेन्शनला स्थगितीचे आदेश

By admin | Published: July 20, 2015 01:37 AM2015-07-20T01:37:51+5:302015-07-20T01:37:51+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ८८ ‘नवीनह्ण स्वातंत्र्यसैनिकांना मंजूर केलेली पेन्शन देण्यास स्थगिती आदेश जारी केले आहेत. माहिती अधिकाराचे कार्यकर्ते अनिल

Order for suspension of 'new' freedom fighters' pension | ‘नवीन’ स्वातंत्र्यसैनिकांच्या पेन्शनला स्थगितीचे आदेश

‘नवीन’ स्वातंत्र्यसैनिकांच्या पेन्शनला स्थगितीचे आदेश

Next

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ८८ ‘नवीनह्ण स्वातंत्र्यसैनिकांना मंजूर केलेली पेन्शन देण्यास स्थगिती आदेश जारी केले आहेत. माहिती अधिकाराचे कार्यकर्ते अनिल गलगली यांनी गेल्या आठवडयात ‘नवीन’ स्वातंत्र्यसैनिकांना मंजूर पेंशन घोटाळा आरटीआय माध्यमातून समोर आणला होता, ज्यात ३ मृतांचा समावेश होता.
बीड मधील ७९, अहमदनगरमधील ४, उस्मानाबाद ४ आणि नांदेडमधील १ अशा
८८ प्रकरणास गेल्या काही महिन्यात मंजूरी दिली होती.
बीडचे जिल्हाधिकारी यांनी पूर्वीचे ११८४ स्वातंत्र्यसैनिक आणि ७९ नवीन प्रकरणे यांस जोडत १६ कोटी रु पयांची मागणी सामान्य प्रशासन विभागाकडे केली होती. पूर्वीच्या नियमित स्वातंत्र्यसैनिकांना ७ कोटी ६६ लाख ६८ हजार ५०० रुपये आणि नवीन स्वातंत्र्य सैनिकांना ८ कोटी ५१ लाख ९७ हजार ५५० रु पये देण्यासाठी अतिरिक्त रक्कम जिल्हा कार्यालयाने मागितली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या स्वातंत्र्यसैनिकांना आणि त्यांच्या वारसाना पेन्शन देण्यापासून स्थगिती दिली आहे. तीन स्वातंत्र्यसैनिकांच्या मृत्युमुळे सदर आदेश जारी केला गेला आहे. बीड जिल्हाधिकारी कार्यालयाने दिनांक २९ मे २०१५ रोजी शासनास कळविले की संभाजी अंबुजी खांडे यांचा मृत्यु दिनांक २५ आॅक्टोबर २०११ रोजी आणि पत्नी मथुराबाई
संभाजी खांडे यांचा मृत्यु दिनांक
८ सप्टेंबर २०१४ रोजी झाला असून वारस मुलगा शहाजी थकबाकी
मागत आहे.
जनाबाई लक्ष्मण येवले यांचा मृत्यु दिनांक २२ आॅगस्ट २०१२ रोजी झाला असून मुलगा अरु ण येवले थकबाकी मागत आहे तर जलसुबाई तुकाराम भोसले या ३० डिसेंबर २००९ रोजी मृत झाल्या असून सून जयश्री गौतम भोसले थकबाकीची मागणी करत आहे.
बीड जिल्हा आणि बोगस स्वातंत्र्यसैनिक असे जुने समीकरण आहे. वर्ष २००७ मध्ये निवृत्त न्यायमूर्ती ए.बी.पालकर यांनी २९८ बोगस स्वातंत्र्यसैनिकांचे पेन्शन रद्द करण्याची शिफारस केल्यानंतर शासनाने त्यास अनुकुलता दर्शविली होती.
(विशेष प्रतिनिधी)

Web Title: Order for suspension of 'new' freedom fighters' pension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.