झेप्टोवरून हापुस आंबे मागविले, अन् खेळ झाला! कंपनीने केला की डिलिव्हरी बॉयने? तुम्हीच सांगा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 16:07 IST2025-04-09T16:06:25+5:302025-04-09T16:07:23+5:30

Zepto Hapus Mango Scam: दक्षिण मुंबईत राहणाऱ्या एका व्यक्तीने झेप्टोवरून ५३० रुपयांचे हापुस आंबे, अर्धा डझन मागविले होते.

Ordered Hapus mangoes from Zepto, and the game was on! Was it the company or the delivery boy? You tell me... | झेप्टोवरून हापुस आंबे मागविले, अन् खेळ झाला! कंपनीने केला की डिलिव्हरी बॉयने? तुम्हीच सांगा...

झेप्टोवरून हापुस आंबे मागविले, अन् खेळ झाला! कंपनीने केला की डिलिव्हरी बॉयने? तुम्हीच सांगा...

फ्लिपकार्ट, अमेझॉन, झेप्टो, ब्लिंकइट सारख्या ई कॉमर्स वेबसाईटवरून सामान मागविणे जेवढे सोपे आहे ना तेवढेच ते धोकादायकही आहे. अनेकदा आपण मोबाईलच्या बॉक्समध्ये साबन, दगड मिळाल्याचे पाहिले आहेत. आता त्यात झेप्टोची भर पडली आहे. हा तर झेप्टोचाच डिलिव्हरी बॉय, अंतरही काही मिनिटांचे, त्याचही या लोकांनी झोल केला आहे. एका व्यक्तीने हापुस आंबे मागविले होते, त्याला आंबे तर काही मिळालेच नाहीत. पण पैसेही परत देण्यास कंपनीने नकार दिला आहे. (Zepto Scam)

दक्षिण मुंबईत राहणाऱ्या एका व्यक्तीने झेप्टोवरून ५३० रुपयांचे हापुस आंबे, अर्धा डझन मागविले होते. डिलिव्हरी बॉय जेव्हा द्यायला आला तेव्हा त्याने सोबत मागविलेले सामान दिले परंतू आंबे आऊट ऑफ स्टॉक असल्याचे सांगितले. तुम्हाला पैसे परत मिळतील असेही तो म्हणाला. आता डिलिव्हरी बॉय झेप्टोचाच होता. आधीच्या अनुभवावरून ग्राहकाने होकार दिला, वर त्या झेप्टो बॉयला टीपही दिली. 

दुसऱ्या दिवशी सकाळी ग्राहकाने पैसे परत आले नाहीत म्हणून झेप्टो कस्टमर केअरशी संपर्क साधला. तिथे त्याला भलतेच कारण देण्यात आले. तुमची ऑर्डर म्हणजे डिलिव्हर दिसत आहे, वर तुम्ही त्याला टीपही दिली आहे यामुळे तुम्हाला रिफंड मिळू शकत नाही. तु्म्ही मागविलेल्या वस्तू पुन्हा तपासा असे आणखी सुचविण्यात आले. कस्टमर केअरने हात वर केलेले पाहून तो ग्राहक चिडला, चॅटवर खूप भांडला परंतू काही फायदा झाला नाही. अखेरीस त्याने दिलेली टीप परत मागितली, त्यावर झेप्टोने ती देखील देण्यास नकार दिला. 

या ग्राहकाने आपल्यासोबत घडलेल्या प्रसंगाची कैफियत सोशल मीडियावर मांडली. यात त्याने मोठी पोस्ट लिहिली आणि म्हटले झेप्टो डिलिव्हरी बॉयने फ्रॉड केला, माझे ५५० रुपये चोरले, असे म्हटले आहे. हापुस आंबे झेप्टोवरून मागविणे ही माझी चूक आहे हे मला कळत होते, तरीही मी मागविले असेही त्याने कबुल केले आहे. झेप्टोवरून मागविताना सावध रहा, असेही त्याने म्हटले आहे. यावर आता नेटकऱ्यांच्या कमेंट येऊ लागल्या आहेत. यावर ते आपले अनुभवही शेअर करत आहेत. एकंदरीतच हापुस आंब्याचे व्यापारी देखील फसवतात पण निदान बनावट आंबेतरी देतात पण झेप्टोवाले पैसे घेतात आणि आंबेही देत नाहीत, असा सूर यातून व्यक्त होत आहे. 

Web Title: Ordered Hapus mangoes from Zepto, and the game was on! Was it the company or the delivery boy? You tell me...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.