आदेशानंतर मिळणार बांधकामांना मंजुरी

By admin | Published: April 27, 2016 04:02 AM2016-04-27T04:02:28+5:302016-04-27T04:02:28+5:30

नव्या बांधकामावर घालण्यात आलेली बंदी सोमवारी उच्च न्यायालयाने उठविल्याने लगेचच मंगळवारपासून बांधकाम आराखडा मंजुरीची कामे सुरू होतील, अशी अपेक्षा होती.

Orders will be approved after the construction | आदेशानंतर मिळणार बांधकामांना मंजुरी

आदेशानंतर मिळणार बांधकामांना मंजुरी

Next

कल्याण : घनकचरा व्यवस्थापनाच्या मुद्द्यावर नव्या बांधकामावर घालण्यात आलेली बंदी सोमवारी उच्च न्यायालयाने उठविल्याने लगेचच मंगळवारपासून बांधकाम आराखडा मंजुरीची कामे सुरू होतील, अशी अपेक्षा होती. परंतु न्यायालयाच्या निर्णयाची प्रत केडीएमसीला न मिळाल्याने हे काम अजून सुरू झालेले नाही. ही प्रत गुरूवारपर्यंत उपलब्ध होण्याची शक्यता असून त्यानंतरच आराखडे मंजूर होतील, असे नगररचना विभागाकडून सांगण्यात आले.
क्षमता संपुष्टात आल्यानंतरही आधारवाडी डम्पिंगवर कचरा टाकणे, घनकचरा व्यवस्थापनाची कार्यवाही योग्य प्रकारे न करणे या मद्द्यावर न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर गेल्यावर्षी १३ एप्रिलला झालेल्या सुनावणीदरम्यान जोपर्यंत घनकचरा व्यवस्थापन योग्य प्रकारे केले जात नाही, तोपर्यंत केडीएमसी क्षेत्रात नवीन बांधकामांवर बंदीचा आदेश न्यायालयाने दिला होता. ही बंदी सोमवारी उठविण्यात आल्याने बांधकाम व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
तब्बल वर्षभर रखडलेल्या बांधकाम परवानगीचा मार्ग मोकळा झाल्याने मंगळवारपासून बांधकाम आराखडा मंजुरीसाठी केडीएमसीच्या नगररचना विभागात बांधकाम व्यावसायिकांची लगबग सुरू होण्याची शक्यता होती. परंतु न्यायालयाच्या आदेशाची प्रत अद्याप हाती न
आल्याने ही कामे सुरू झाली नसल्याची माहिती नगररचनाकार सुरेंद्र टेंगळे यांनी दिली. दोन दिवसात आदेशाची प्रत उपलब्ध होईल. त्या आदेशाचा अभ्यास करून पुढील अंमलबजावणी होईल, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Orders will be approved after the construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.