‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेचा अध्यादेश जारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 03:47 AM2017-08-03T03:47:57+5:302017-08-03T03:48:06+5:30
ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ७ लाख ५० हजार रुपये आहे, अशा समाजातील सर्व घटकांना आता ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेचा लाभ मिळणार आहे.
Next
कोल्हापूर : ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ७ लाख ५० हजार रुपये आहे, अशा समाजातील सर्व घटकांना आता ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेचा लाभ मिळणार आहे. राज्य शासनाने या योजनेतील किचकट अटी वगळून सुधारित आदेश मंगळवारी काढला.
ही योजना एक आॅगस्ट २०१७ रोजी व त्यानंतर जन्मलेल्या मुलींनाच लागू राहील. मुलींचा जन्मदर वाढविणे, तिच्या जन्माबाबत सकारात्मक वातावरण तयार व्हावे व बालविवाहास प्रतिबंध म्हणून राज्य शासनाने १ जानेवारी २०१४ला सुकन्या योजना सुरू केली. या योजनेचे राज्यात २६ हजार ८६२ लाभार्थी आहेत.