राज्यात अवयवदानाने केली शंभरी पार, तज्ज्ञांच्या मते अजून वाढ शक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2023 08:50 AM2023-01-01T08:50:17+5:302023-01-01T08:51:28+5:30

राज्यात मेंदूमृत अवयवदानाचे आणि त्याचे वाटपाचे काम ४ विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समिती काम पाहत असतात. त्यामध्ये मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या जिल्ह्यांतील समितीचा समावेश आहे.

Organ donation has crossed 100 in the state, according to experts, further increase is possible | राज्यात अवयवदानाने केली शंभरी पार, तज्ज्ञांच्या मते अजून वाढ शक्य

राज्यात अवयवदानाने केली शंभरी पार, तज्ज्ञांच्या मते अजून वाढ शक्य

Next

मुंबई : राज्यात हजारोंच्या संख्येने रुग्ण विविध अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत. त्याकरिता अवयवदानाचा आकडा वाढणे गरजेचे आहे. मागील दोन वर्षांच्या  कोरोना काळात हा आकडा कमी झाला. मात्र, गेल्या वर्षभरात अवयवदानाचा आकडा वाढला आहे. राज्यभरात  २०२२ या वर्षात १०३ मेंदूमृत अवयवदान झाले आहे. त्यामुळे राज्यातील काही शेकडो रुग्णांना जीवनदान मिळाले आहे. 

राज्यात मेंदूमृत अवयवदानाचे आणि त्याचे वाटपाचे काम ४ विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समिती काम पाहत असतात. त्यामध्ये मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या जिल्ह्यांतील समितीचा समावेश आहे. या जिल्हानिहाय समिती आपल्या परिसरातील अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणाऱ्या रुग्णालयातील रुग्णाच्या प्रतीक्षा यादीचे काम पाहत असतात, तसेच मेंदूमृत अवयवांचे वाटप नियमाप्रमाणे करत असतात. मेंदूमृत अवयव दान प्रक्रियेत पुणे आणि मुंबई या विभागीय समितीचे अवयदान मोठ्या प्रमाणावर असते.

गेली मागील दोन वर्षे कोरोनाचा काळ होता म्हणून कमी अवयवदान झाले. त्या अगोदरच्या अवयवदानाचा आकडा मोठा होता. येत्या काळात नक्कीच हा आकडा वाढेल असा मला विश्वास आहे. कारण नागरिकामंध्ये याबाबतची जनजागृती होत आहे. सर्व विभागीय समिती अवयवदानाचा आकडा वाढावा म्हणून प्रयत्न करीत आहे. २०१९ सालात मोठ्या प्रमाणात अवयवदान झाले होते. मात्र त्या नंतरच्या काळात कोरोनामुळे आकडा कमी झाला. अवयवाची गरज पाहता नक्कीच अवयवदानाचा आकडा वाढणे गरजेचे आहे.  
- डॉ. सुजाता पटवर्धन, संचालक, राज्य अवयव आणि उतीपेशी प्रत्यारोपण संस्था. 

मोठ्या रुग्णालयांना मेंदूमृत रुग्णाचे अवयव काढून घेण्यासाठीची परवानगी शासनाने दिली पाहिजे. कारण अशा रुग्णालयात मेंदूमृत व्यक्ती असतील तर त्याचे अवयव घेताना त्रास होतो. तसेच या रुग्णालयांनी ज्या रुग्णालयात अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होतात त्यांच्यासोबत संलग्न व्हावे. त्यामुळे मेंदूमृत रुग्णांचे अवयवदान वाढू शकते. तसेच शासकीय रुग्णालयात मेंदूमृत रुग्ण ओळखून तेथील अवयवदान वाढविले पाहिजे. 
- डॉ. सुरेंद्र माथूर, अध्यक्ष, मुंबई विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समिती

अवयवनिहाय रुग्णांची प्रतीक्षा यादी 
किडनी     : ५७७७ 
यकृत      : १४७८ 
हृदय      : १३१ 
फुफ्फुस     : ४० 
स्वादुपिंड     : ५७ 
छोटे आतडे     : ११ 

Web Title: Organ donation has crossed 100 in the state, according to experts, further increase is possible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.