रास्तारोको करून जव्हारमध्ये माकपाचे सभेचे आयोजन
By admin | Published: September 2, 2016 03:23 PM2016-09-02T15:23:37+5:302016-09-02T15:55:19+5:30
जव्हार तालुक्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे साकीनााका, गोरवाडीनाका येथे रास्तारोको करण्यात आला
Next
>ऑनलाइन लोकमत
जव्हार, दि. २ - जव्हार तालुक्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे साकीनााका, गोरवाडीनाका येथे रास्तारोको करण्यात आला.
या रातारोको दरम्यान सभेचे आयोजन करण्यात आले.
जव्हारमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे- रतन बुधर यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी शुक्रवारी आदिवासींचे पारंपारिक वाद्य, तारपानृत्य करून चार तास रास्तारोको करण्यात आला. या रास्तारोको दरम्यान, करण्यात आलेल्या मागण्या, वन पट्यांचे वाढीव क्षेत्र सातबारा उत्त-रासहित मिळावे, मजुरांना रोजगार मिळावा, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, जव्हार, मोखाड्यात आती पाऊसामुळे वाहून गेलेलं रस्ते नव्यानं तयार करून देण्यात यावे,पालघर जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीमध्ये प्रथम संधी दयावी, वारंवार खंडित होणारी विद्युत जोडणी व्यवस्थित करावी,
जव्हार नगरपरिषदेत हद्दीत बांधलेले गाळे आदिवासी व बिगर आदिवासी तरुण तरुणांना मिळाला पाहिजे, नगरपरिषद हद्दीततील शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळालाच पाहिजे, प्रत्येक कुटुंबाला एपीएल कार्डधारकांना अन्न सुरक्षेचा लाभ मिळाला पाहिजे, घरकुल योजनेचा लाभ मिळाला पाहिजे, शासनाच्या नियमानुसार धारकांना नियमानुसार नियम अटी लागू करून सातबारा देण्यात यावा, प्रॉपर्टी कार्डावर नावे लावून नवरा -बायकोच्या उतारा मिळाला पाहिजे, असा या रास्तारोको दरम्यान मागण्या करण्यात आलेल्या आहेत.
यावेळी हा रास्तारोको व सभा दरम्यान- रतन बुधर- जि. प. सदस्य पालघर, प. स.सदस्य,- लक्ष्मण जाधव, व यशवंत घाटाळ, जिल्हा कमिटी सदस्य- शिवराम बुधर,
तालुध्यक्ष- यशवंत घाटाळ, उपताध्यक्ष- विजय शिंदे, जि. प. सदस्य- बाबू ढिगारे, जव्हारध्यक्ष- अलताभ शेख, व माकपाचे शेकडो कार्यकर्त्या या रास्तारोकोत सहभागी झाले होते.