उस्मानाबाद एसटी डेपोत मेकॅनिकची बसमध्येच आत्महत्या
By Admin | Published: March 2, 2016 09:02 AM2016-03-02T09:02:52+5:302016-03-02T10:54:32+5:30
उस्मानाबादमधील एसटी डेपोत काम करणा-या एका मेकॅनिकने डेपोमध्ये उभ्या असलेल्या एका बसमध्येच गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.
>ऑनलाइन लोकमत
उस्मानबाद, दि. २ - उस्मानाबादमधील एसटी डेपोत काम करणा-या एका मेकॅनिकने डेपोमध्ये उभ्या असलेल्या एका बसमध्येच गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आज सकाळी लातूरला बस घेऊन जाण्यासाठी बस ड्रायव्हर व कंडक्टर बसमध्ये चढले असता, बसमध्येच एका कर्मचा-याचा मृतदेह पाहून त्यांना धक्का बसला. हा मृतदेह एसटी डेपोत मेकॅनिकचे काम करणा-या इसमाचा असून त्याचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. कामाच्या तणावातून त्याने आत्महत्येचे पाऊल उचलल्याची शक्यता व्यक्त होत आहे.