उस्मानाबादच्या तरुणाला पुण्यात लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2016 11:31 AM2016-07-04T11:31:04+5:302016-07-04T11:31:44+5:30

कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या उस्मानाबादच्या तरुणावर वार करून लुटण्यात आल्याची घटना पुण्यात घडली.

Osmanabad's youth was robbed in Pune | उस्मानाबादच्या तरुणाला पुण्यात लुटले

उस्मानाबादच्या तरुणाला पुण्यात लुटले

Next
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ४ - कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या उस्मानाबादच्या तरुणाला बालगन्धर्व चौकामध्ये वार करून लुटण्यात आल्याची घटना सोमवारी पहाटे पावणेचारच्या सुमारास घडली. डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चोरटयांनी पाच हजारांचा मोबाईल आणि 200 रुपये लंपास केले. 
अमोल तुळशीदास ठोबरे (वय 27, रा. कर्वेनगर, मूळ रा. उस्मानाबाद) असे जखमीचे नाव आहे. दुचाकीवरून आलेल्या चोरटयांनी चाकूने वार करून हि लूट केली असून तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहे.

Web Title: Osmanabad's youth was robbed in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.