अन्य जिल्ह्यांनाही विभाजनाचे वेध!
By admin | Published: June 16, 2014 04:06 AM2014-06-16T04:06:39+5:302014-06-16T04:06:39+5:30
ठाणे जिल्हा विभाजनाच्या घोषणेनंतर राज्यातील इतर जिल्ह्यांच्या विभाजनाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे़
Next
मुंबई : ठाणे जिल्हा विभाजनाच्या घोषणेनंतर राज्यातील इतर जिल्ह्यांच्या विभाजनाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे़ नागपूर (काटोल), यवतमाळ (पुसद), पुणे (बारामती), अहमदनगर, सातारा (कऱ्हाड), नांदेड (किनवट) या जिल्ह्यांच्या विभाजनाची मागणी आता जोर धरू लागली आहे़ ठाणे जिल्ह्याच्या निर्णयानंतर त्या त्या जिल्ह्यातील नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत़ राज्यातील अनेक जिल्ह्यांचे मुख्यालय हे त्या जिल्ह्यातील शेवटच्या गावापासून फार दूर असल्याने त्यांची गैरसोय होत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे़ त्यामुळे आता इतर जिल्ह्यांच्या विभाजनाची मागणी जोर धरू शकते़ (लोकमत न्यूज नेटवर्क)