इतर धर्मीय इतक्या मुलांना जन्म देऊ शकतात, तुम्हाला कोणी अडवलंय? - सरसंघचालकांचा हिंदूना सवाल

By admin | Published: August 21, 2016 08:42 AM2016-08-21T08:42:37+5:302016-08-21T08:42:37+5:30

हिंदू नागरिकांनी जास्त मुलांना जन्म द्यावा असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे.

Other people can give birth to so many children, who have you been banned? - Sarasanghchakkas Hindus question | इतर धर्मीय इतक्या मुलांना जन्म देऊ शकतात, तुम्हाला कोणी अडवलंय? - सरसंघचालकांचा हिंदूना सवाल

इतर धर्मीय इतक्या मुलांना जन्म देऊ शकतात, तुम्हाला कोणी अडवलंय? - सरसंघचालकांचा हिंदूना सवाल

Next

ऑनलाइन लोकमत
आग्रा, दि. २१ : हिंदू नागरिकांनी जास्त मुलांना जन्म द्यावा असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. आग्रा येथिल एका कार्यक्रमात मोहन भागवतांनी हे आवाहन केलं आहे. मोहन भागवत यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. जर इतर धर्मीय इतक्या मुलांना जन्म देऊ शकतात, तर तुम्हाला कोणी अडवलंय? असा सवाल भागवतांनी यावेळी उपस्थित केला. हिंदूंची लोकसंख्या कमी होत असल्यामुळे भागवतांनी हा सल्ला दिला आहे.

हिंदूंनी जास्त मुलांना जन्म दिला पाहिजे असं आवाहन यापूर्वी प्रविण तोगडिया, साक्षी महाराज, साध्वी प्राची यांनी केलं होतं. त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र आता सरसंघचालकांच्या अशा वक्तव्यामुळे पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Web Title: Other people can give birth to so many children, who have you been banned? - Sarasanghchakkas Hindus question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.