"नाहीतर जी भाषा रणवीर अलाहाबादियाला समजते, त्या भाषेत..."; शिंदेंची शिवसेना आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 15:43 IST2025-02-10T15:41:00+5:302025-02-10T15:43:41+5:30

Ranveer Allahbadia: युट्यूबर रणवीर अलाहाबादियाने केलेल्या विधानावर शिंदेंच्या शिवसेनेच्या संताप व्यक्त केला आहे. 

"Otherwise, in the language that Ranveer Allahabadia understands..."; Shinde's Shiv Sena aggressive | "नाहीतर जी भाषा रणवीर अलाहाबादियाला समजते, त्या भाषेत..."; शिंदेंची शिवसेना आक्रमक

"नाहीतर जी भाषा रणवीर अलाहाबादियाला समजते, त्या भाषेत..."; शिंदेंची शिवसेना आक्रमक

Ranveer Allahbadia News: 'महाराष्ट्रात आई बहि‍णींचा अपमान करणारी भाषा चालणार नाही. त्या रणवीर अलाहाबादियाला साध्या भाषेत समजले नाही, तर त्याच्या भाषेत समजावून सांगू', असा इशारा शिंदेंच्या शिवसेनेचे नेते राजू वाघमारे यांनी दिला आहे. इंडियाज गॉट लॅटेंट शो मध्ये रणवीर अलाहाबादियाने केलेल्या अश्लाघ्य विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.   

शिंदेंच्या शिवसेनेचे नेते राजू वाघमारे म्हणाले, "हा देश प्रभू रामचंद्रांची भूमी आहे. महाराष्ट्र शिवछत्रपती, शाहू, फुले, आंबेडकरांचा आहे. या देशात आणि महाराष्ट्रात अशा प्रकारची विधाने, जाहीरपणे शिवीगाळ करणे, आई बहि‍णींची अब्रू काढणे, धार्मिक तेढ निर्माण करणे, एक दुसऱ्या प्रती दुजाभाव निर्माण करणे आणि अशी शिवीगाळ जर कोणी टिव्हीवर करत असेल, सोशल मीडियावर करत असेल, त्याचे परिणाम दूरपर्यंत होतात."

रणवीर अलाहाबादियाला शिवसेनेचा इशारा

"आम्ही जो पण तो युट्यूबर आहे अलाहाबादिया त्याला इशारा देतो की, अशा प्रकारची विधाने, अशा प्रकार आई बहि‍णींचा अपमान करू नये. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग करू नये. नाहीतर त्याचा जो पण शो असेल, तो शिवसेना बंद करेल. त्याला अशा प्रकारची विधाने करण्यापासून थांबवण्यासाठी कायदेशीर पद्धतीनेही प्रयत्न करणार", असा राजू वाघमारे म्हणाले.  

"आपल्या देशात आई बहि‍णींचा अपमान करणाऱ्यांना शिवसेना आपल्या स्टाईलने आणि जी भाषा अलाहाबादियाला समजते... मी ज्या भाषेत बोलतोय, ती समजत असेल तर चांगली गोष्ट आहे. नाहीतर जी भाषा त्याला समजते, त्या भाषेत त्याला समजवू", असा इशारा शिवसेनेचे नेते वाघमारे यांनी रणवीर अलाहाबादिया याला दिला.  

मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार

रणवीर अलाहाबादियासह इतर क्रिएटर्संवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी खार मधील ज्या स्टुडिओमध्ये इंडियाज गॉट लॅटेंट शोचे शुटिंग झाले आहे, तिथे भेट देऊन चौकशी केली आहे. 

Web Title: "Otherwise, in the language that Ranveer Allahabadia understands..."; Shinde's Shiv Sena aggressive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.