...अन्यथा स्मार्ट सिटीला विरोध

By admin | Published: December 17, 2015 02:33 AM2015-12-17T02:33:18+5:302015-12-17T02:33:18+5:30

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटीबाबत शिवसेना नगरसेवकांनी मांडलेल्या उपसूचना मान्य केल्या नाहीत, तर शिवसेना हा प्रस्ताव स्वीकारणार नाही. आमचा स्मार्ट सिटीला विरोध कायम राहिल.

... otherwise protesting to the smart city | ...अन्यथा स्मार्ट सिटीला विरोध

...अन्यथा स्मार्ट सिटीला विरोध

Next

मुंबई : केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटीबाबत शिवसेना नगरसेवकांनी मांडलेल्या उपसूचना मान्य केल्या नाहीत, तर शिवसेना हा प्रस्ताव स्वीकारणार नाही. आमचा स्मार्ट सिटीला विरोध कायम राहिल. कोणत्याही मुद्द्यावर लाचारी पत्करणार नाही, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिला.
शिवसेनाभवन येथे पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मुंबई किंवा राज्यातील अन्य महापालिकांची स्वायत्तता कोणत्याही स्थितीत जाता कामा नये. त्यासाठी आम्ही लढा देत राहू. मुंबईचे स्वामित्व केंद्र सरकारकडे जावे, हे भाजपालाही मान्य होणार नाही. आमच्या उपसूचना मान्य केल्या नाहीत, तर केंद्राचा प्रस्ताव स्वीकारणार नाही, असे ठाकरे यांनी सांगितले. राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्या वक्तव्याच्या पाश्वर्भूमीवर त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर शिवसेना ठाम आहे. तर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कार्यालयावरील छापे सूडाचे राजकारण आहे की भ्रष्टाचाराचे प्रकरण हे चौकशीअंती कळेल. पण, या छाप्यांमागे जर सूडाचे राजकारण असेल, तर जनता ते पाहून घेईल, असेही उद्धव म्हणाले.

Web Title: ... otherwise protesting to the smart city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.