...अन्यथा भूखंड परत करा- हायकोर्ट
By admin | Published: November 17, 2016 04:15 AM2016-11-17T04:15:43+5:302016-11-17T04:11:59+5:30
नवी मुंबईच्या महापौर बंगल्याशेजारील हडपण्यात आलेले सिडकोचे सहा भूखंड कायदेशीरपणे खरेदी करा किंवा परत करा, अशी तंबी उच्च न्यायालयाने
मुंबई : नवी मुंबईच्या महापौर बंगल्याशेजारील हडपण्यात आलेले सिडकोचे सहा भूखंड कायदेशीरपणे खरेदी करा किंवा परत करा, अशी तंबी उच्च न्यायालयाने नवी मुंबई महापालिकेला देत दोन आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले.
नवी मुंबई महापालिकेने सिडकोच्या सहा भूखंडांवर अतिक्रमण करून त्यावर गार्डन बांधले आहे. या भूखंडांच्या शेजारीच महापौरांचा बंगला आहे. नवी मुंबई महापालिकेकडून हे भूखंड परत घेण्याचा आदेश सिडकोला द्यावा, अशी मागणी करणाऱ्या दोन जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत.
महापालिकेने अतिक्रमण हटवण्याचे काम करत इथे तर खुद्द महापालिकेनेच सिडकोच्या जागेवर अतिक्रमण केले आहे. कोणत्या अधिकारांतर्गत महापालिकेने या जागेवर गार्डन बांधले? अशी विचारणाही खंडपीठाने केली, ‘सिडकोने तुमची (महापालिका) भूखंड देण्याची विनंती अमान्य केली म्हणून अशा पद्धतीने त्यावर कब्जा मिळवणार? जर भूखंड हवे असतील तर ते सिडकोकडून खरेदी करा आणि त्यावर निर्माण केलेल गार्डन सर्वसामान्यांसाठी खुले करा,’ असे खंडपीठाने म्हटले. (प्रतिनिधी)