...अन्यथा वाहन परवाना रद्द होणार

By admin | Published: April 8, 2017 05:19 AM2017-04-08T05:19:34+5:302017-04-08T05:19:34+5:30

गेल्या काही महिन्यांपासून एसटीच्या चालक-वाहकांना किरकोळ कारणांवरून अन्य वाहन चालकांकडून मारहाणीच्या घटना घडत आहेत.

... otherwise the vehicle license can be canceled | ...अन्यथा वाहन परवाना रद्द होणार

...अन्यथा वाहन परवाना रद्द होणार

Next

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून एसटीच्या चालक-वाहकांना किरकोळ कारणांवरून अन्य वाहन चालकांकडून मारहाणीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे एसटी चालकांना संरक्षण द्या आणि मारहाण करणाऱ्या अन्य चालकांना कठोर शिक्षा करण्याची मागणी चालक, वाहकांकडून केली जात होती. त्यानुसार, एसटी बसेसना अडथळा करणाऱ्या, तसेच चालक-वाहकांना मारहाण करणाऱ्या खासगी बसेस, आॅटोरिक्षा, टॅक्सी चालकांविरुद्ध मोटारवाहन अधिनियम, १९८८ च्या कलम १९(१)(एफ)नुसार लायसन्स अपात्र अथवा रद्द करण्याचा, तसेच परवाना निलंबित अथवा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा, परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष दिवाकर रावते यांनी विधिमंडळात केली.
गेल्या फेब्रुवारी महिन्यात भिवंडी आगाराचे चालक प्रभाकर गायकवाड यांची आगारातील गेटवर असणाऱ्या रिक्षा चालकांसोबत झालेल्या वादात, गायकवाड यांना काही रिक्षा चालकांनी मारहाण केली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पसरली. त्यानंतर, कर्मचाऱ्यांकडून उत्स्फूर्त काम बंद आंदोलन करत, मारहाण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली, परंतु चालकाचा मृत्यू हृदयविकाराने झाला असून, तसे पोर्स्टमार्टेम अहवालातूनच उघड झाल्याचे, एसटी महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले, तसेच चालकाला मारहाण झाली नसल्याचा दावाही करण्यात आला. मात्र त्यानंतर, ठाण्यासह राज्यातील काही आगार व स्थानकातील एसटी चालक, वाहकांना अन्य वाहक चालकांकडून मारहाणीच्या घटना घडल्या. त्याची गंभीर दखल घेत, लायसन्स किंवा परवाना रद्द करण्याचा निर्णय परिवहनमंत्र्यांकडून घेण्यात आला. एसटीकडून १ जानेवारी २0१७ पासून गाव ते तालुका, तालुका ते जिल्हा अशी सर्व थांब्यावर शटल सेवा सुरू केली आहे (प्रतिनिधी)
>विनाथांबा सेवेचा फायदा
प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी विनावाहक-विनाथांबा फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. या सेवांमुळे अवैध खासगी वाहतुकीस पायबंद झाला असून, परिणामी त्या वैफल्यग्रस्त मानसिकतेतून एसटी चालक-वाहकांवर हल्ले करण्यात येत असल्याचे दिवाकर रावते यांनी सांगितले.

Web Title: ... otherwise the vehicle license can be canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.