“वरिष्ठांना सांगू, अन्यथा तुतारी वाजवायला किती वेळ लागणार आहे”; रामराजेंचा थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2024 07:20 PM2024-09-01T19:20:32+5:302024-09-01T19:23:38+5:30

Ramraje Naik Nimbalkar: रामराजे यांनी तुतारी हाती घेतल्यास अजित पवार गटाला मोठा धक्का बसू शकतो, असे सांगितले जात आहे.

otherwise will join ncp sharad pawar group a direct warning from ramraje naik nimbalkar | “वरिष्ठांना सांगू, अन्यथा तुतारी वाजवायला किती वेळ लागणार आहे”; रामराजेंचा थेट इशारा

“वरिष्ठांना सांगू, अन्यथा तुतारी वाजवायला किती वेळ लागणार आहे”; रामराजेंचा थेट इशारा

Ramraje Naik Nimbalkar: आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. यातच अनेक विषयांवरून महाविकास आघाडीचे नेते महायुती सरकारवर टीका करताना पाहायला मिळत आहेत. यातच महायुतीत अंतर्गत कलह असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजपा तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक जण तुतारी फुंकण्यास उत्सुक असल्याचे म्हटले जात आहे. समरजित सिंह घाटगे यांनी तुतारी हाती घेतल्यानंतर आता अजित पवार गटाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी तुतारी हाती घेण्याचा इशारा दिला आहे. 

फलटणमध्ये महायुतीत फूट पडल्याचे चित्र आहे. भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्यामध्ये लोकसभा निवडणुकीपासूनच शाब्दिक वार सुरू आहेत. अजित पवार यांचा फलटण दौरा असून, त्या पार्श्वभूमीवर रामराजे यांच्या नेतृत्वाखाली फलटणमध्ये बैठक झाली. या बैठकीत रामराजे नाईक निंबाळकर यांनी भाजपाच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे. 

अन्यथा तुतारी वाजवायला किती वेळ लागणार आहे

शेवटी काय करायचे आणि काय नाही, हे आपल्या हातात राहिलेले नाही. ते भारतीय जनता पार्टीच्या राज्य पातळीच्या नेतृत्वाचे त्यांचे कार्यकर्ते सांभाळण्याचे काम आहे. प्रशासनाला सांभाळण्याचे काम आहे. त्यामध्ये सुधारणा झाली तर ठीक आहे. आता प्रश्न तुम्ही जो मांडला आहे. त्याबाबत तुम्ही तीन महिन्यापूर्वी तुतारी सांगितली. आपले भाजपासोबत भांडण नाही. आपण हिंदूत्व, मुस्लीम असे काही करत नाही. आपली तक्रार फक्त रणजितसिंह नाईक निंबाळकरांबाबत आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे साथीदार गल्लोगल्ली दहशत करत आहेत. या दहशतीला सपोर्ट करु नका, एवढीच आपली तक्रार आहे. तेवढ त्यांना सांगून बघू. फरक पडला तर ठीक, अन्यथा तुतारी वाजवायला किती वेळ लागणार आहे, असा थेट इशारा रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिला आहे. 

दरम्यान, शरद पवारांशी फारकत घेतल्यापासून रामराजे निंबाळकर अजित पवारांसोबत होते. आता स्थानिक पातळीवरील वादामुळे तुतारीसोबत जाण्याचा इशारा दिला आहे. लोकसभा निवडणुकीतही रामराजे निंबाळकर यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना मदत केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. रामराजेंना थांबण्यात अजित पवार यांना यश आले नाही, तर हा मोठा धक्का बसू शकतो, असे म्हटले जात आहे. 
 

Web Title: otherwise will join ncp sharad pawar group a direct warning from ramraje naik nimbalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.