आमची पिकं जळतील!

By admin | Published: December 14, 2015 12:01 AM2015-12-14T00:01:45+5:302015-12-14T00:01:45+5:30

प्राधिकरणाचे एक सदस्य एस. व्ही. सोडल हे लाभार्थी असल्याच्या मुद्यावरून उजनीत येथील धरणांतून पाणी सोडण्याचा निर्णय रद्द केला असला, तरी सोमवारी प्राधिकरण नव्याने सुनावणी घेणार आहे

Our crops will burn! | आमची पिकं जळतील!

आमची पिकं जळतील!

Next

पुणे : प्राधिकरणाचे एक सदस्य एस. व्ही. सोडल हे लाभार्थी असल्याच्या मुद्यावरून उजनीत येथील धरणांतून पाणी सोडण्याचा निर्णय रद्द केला असला, तरी सोमवारी प्राधिकरण नव्याने सुनावणी घेणार आहे. याकडे खासकरून चासकमान लाभक्षेत्रातील शेतकरी व मुळशीकरांचे लक्ष लागून आहे.
कारण पुन्हा पाणी सोडण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला, तर चासकमान लाभक्षेत्रातील १ हजार हेक्टरवरील शेती धोक्यात येणार आहे. येथील पिकं जळून जातील अशी भिती शेतकरी व्यक्त करत आहेत.
चासकमान धरणाची क्षमता ३ टीएमसी आहे. त्यातील शेतीसाठी ११२ दलघमी राखीव आहे. यातील ७३ दलघमी पाणी सोडण्याचे पूर्वीचे आदेश होते. या आदेशानुसार चासकमानच्या लाभक्षेत्रासाठी ३९ दलघमी पाणी शिल्लक राहणार होते. यातील पाण्यातून चासकमान लाभक्षेत्रासाठीचे आवर्तन सुरू आहे. यात पिण्याच्या पाण्याचाही समावेश आहे. यामुळे याच आवर्तनात हे पाणी संपणार आहे. मग पुढील सात महिने यांच्या शेतीसाठी पाणीच मिळणार नाही. त्यामुळे पिके जळून जातील. त्यामुळे येथील शेतकरी पाणी सोडू देण्यास तयार नाहीत. मात्र, उद्या प्राधिकरणाने पुन्हा पाणी सोडण्याचे आदेश दिले, तर शेती वाया जाणार असल्याने शेतकरी या निर्णयकडे लक्ष ठेवून आहे. हाच मुद्या आम्ही उद्या प्राधिकरणापुढे मांडणार असल्याचे याचिकाकर्ते अ‍ॅड. सुरेश पलांडे यांनी सांगितले.
मुळशी हे धरण टाटांच्या मालकीचे आहे. यातील मुळशीकरांसाठी ३४ दलघमी पाणी राखीव आहे. यात यंदा पाऊस कमी पडल्याने फक्त ३० दलघमी पाणी मुळशीच्या वाट्याला आले आहे. यातील २६ दलघमी पाणी सोडले, तर फक्त ४ दलघमी पाणी मुळशीकरांना शिल्लक राहणार आहे. यात २0११ च्या जनगणनेनुसार १ लाख ७३ हजार लोकसंख्या व त्यानंतर वाढलेली धरून ३ लाख लोकसंख्या आहे. ३५ हजार जनावरे आहेत. त्यांच्यासाठीचे चारापिके आहेत. ऊस वगळता ३३ हेक्टरवर रब्बी पीक आहेत. याच्यासाठी फक्त ४ दलघमी पाणी पुरणार नाही. न्यायालयात आम्ही हे पटवून देऊ. पिण्यासाठी, शेतीसाठी व उद्योगासाठी हा पाण्याचा क्रम आहे. मग मुळशी धरणावर होत असलेली वीजनिर्मिती हे उद्योगात येते. मग त्यातील पाणी सोडा. मुळशीकरांच्या तोंडचे पाणी देऊ नका, असे आम्ही प्राधिकरणापुढे मांडणार असल्याचे मुळशी पंचायत समितीचे सभापती रवींद्र खंदारे यांनी सांगितले.
1उजनी धरणात सध्या ५८ टीएमसी मृत साठा शिल्लक आहे. ६४ टीएमसीपर्यंत अचलसाठा असतो. समजा वरच्या धरणांतून १० टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला, तर यातील साधारण ६ टीएमसी पाणी उजनीत पोहोचेल. त्यामुळे ६४ टीएमसीच पाणी होईल. यातून उजनीचा साठा जिवंत होईल, असेही शक्य नाही. मृतसाठ्यातून पाणी शेतीसाठी न देण्याचा निर्णय आहे. मग वरील पाणी सोडून नेमके काय साध्य होणार, असाही प्रश्न याचिकाकर्त्यांनी केला आहे.
चासकमान धरणात आजच्या तारखेला १३३ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. यातील ९0 दलघमी पाणी
गेले तर ४३ दलघमी पाणी राहील. आताचे आवर्तन गेल्याने येथील शेतकऱ्यांची पिण्याच्या पाण्यासाठीही वणवण होणार आहे.

Web Title: Our crops will burn!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.