तुमची संघर्षयात्रा तर आमची संवादयात्रा - मुख्यमंत्री
By admin | Published: April 27, 2017 04:21 PM2017-04-27T16:21:56+5:302017-04-27T17:10:54+5:30
शेतकऱ्यांच्या आजच्या अवस्थेला जबाबदार असलेले नेतेच संघर्षयात्रा काढत आहेत. केवळ संघर्ष नाव दिल्याने संघर्ष यात्रा होत नाही, मनापासून संघर्ष करावा लागतो.
Next
>ऑनलाइन लोकमत
पिंपरी , दि. 27 - शेतकऱ्यांच्या आजच्या अवस्थेला जबाबदार असलेले नेतेच संघर्षयात्रा काढत आहेत. केवळ संघर्ष नाव दिल्याने संघर्षयात्रा होत नाही, मनापासून संघर्ष करावा लागतो. दिवंगत गोपीनाथ मुंडेंच्या संघर्षयात्रेने परिवर्तन घडवले होते, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या संघर्षयात्रेवर सडकून टीका केली. पिंपरीत भारतीय जनता पार्टीच्या राज्य कार्यकारणीचा गुरुवारी समारोप झाला. यावेळी ते बोलत होते.
विरोधकांना त्यांच्या कर्तृत्वामुळेच संघर्षयात्रा काढावी लागत आहे. संघर्ष यात्रेला कोणचेही समर्थन मिळाले नसून कार्यकर्त्यांना घेऊन संघर्षयात्रा सुरू आहे. शेतकऱ्यांची मिळालेली सर्व पॅकेजेस याच नेत्यांनी लाटली, असा आरोप करत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला. तसेच, त्यांची संघर्ष यात्रा असेल तर आमची संवाद यात्रा असेल, असे सांगून कार्यकर्त्यांना जनतेशी संवाद साधण्याचे आवाहन केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील काही ठळक मुद्दे -
- विश्वासाचं राजकारण केल्यानेचं भाजपाला यश
- 2017 मध्ये मिळालेला विजय जनतेने दिलेली कामाची पावती आहे
- विकास, विश्वासाच्या राजकारणाची देशात लाट
- विकास, विश्वासाच्या राजकारणाची देशात लाट
- ही नुसती लाट नाही, तर त्सुनामी आहे
- लातूरमध्ये शून्यातून सत्ता मिळवली, सगळीकडे विकासाला साथ मिळत आहे
- परिवर्तन करू शकतो म्हणून आपल्याला जनतेनं कौल दिला
- भाजपा आता महाराष्ट्रव्यापी झाला आहे
- भाजपला मिळालेलं यश हा लोकांनी दाखवलेला विश्वास आहे, तो कायम ठेवा
- जनतेशी असलेली नाळ तुटू देऊ नका
- मराठवाड्यात भाजपची मोठी वाढ झाली
- जनता ही राम आहे, आपल्याला रामराज्य निर्माण करायचंय
- छोट्या पदाच्या अहंकाराने आपण लोकांपासून दूर जातो
- सत्ता परिवर्तनाकरिता कार्यकर्ता काम करत होता. आता तसं करायचं नाही, तर समाज परिवर्तन करायचं आहे
- काँग्रेसचे सर्व बुरूज ढासळले, पिंपरीत पवारांचा बुरुजही ढासळला, कमळ फुलले.
- भाजपा हा महाराष्ट्रव्यापी पार्टी आहे , कोणत्याही एका विभागाचा नाही
- एवढी वेगवेळी अनेकजण पदे घेतात, मग त्यांचं नाव कोणाला माहीत नसतं. त्याचं कर्तृव्य लक्षात राहतं
- विजयाने उन्मत्त, अहंकारी न होता प्रामाणिकपणे काम करुन समाज परिवर्तन घडवायचंय
- जातीचं, भ्रष्ट्राचाराचं आपल्याला राजकारण करायचं नाही
- भाजपाच्या सर्व आमदार, खासदार, जिल्हा परिषद अध्यक्षांनी पारदर्शकतेबाबत तडजोड करू नये
- संघर्ष यात्रेला नाव दिल्यानं संघर्ष होत नाही. मनापासून संघर्ष करावा लागतो
- संघर्ष यात्रेला समर्थन मिळाले नाही, कार्यकर्त्यांना घेऊन संघर्ष यात्रा सुरू आहे, त्याकडे लोकांनी पाठ फिरवली आहे
- केवळ नाव दिल्याने संघर्षयात्रा होत नाही, गोपीनाथ मुंडेंच्या संघर्षयात्रेने परिवर्तन घडवलं होतं
- त्यांची संघर्ष यात्रा असेल, तर आमची संवाद यात्रा असेल
- पंतप्रधानांचं पॅकेज आलं ते त्यांच्या आमदार, खासदारांनी खाऊन टाकलं
- जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून मागेलं त्याला शेततळं दिलं
- जलयुक्त शिवारमुळे दुबार पेरणीची नामुष्की टळली
- मोठ्या प्रमाणात जनतेशी संवाद साधला पाहिजे
- वेगवेगळ्या योजणांच्या माध्यमातून संवाद जनतेशी साधला पाहिजे
- तुमची संघर्षयात्रा तर आमची संवादयात्रा, आमदार, खासदार शिवारावर संवाद साधतील, एसी बसने प्रवास नसेल
- शेतकऱ्यांच्या आजच्या अवस्थेला जबाबदार असलेले नेतेच आज संघर्षयात्रा काढत आहेत
- देशात 11 लाख टन खरेदी, एकट्या महाराष्ट्रात 4 लाख टन खरेदी
- 20 हजार तूर घेऊन तुम्ही शेतक-यांना रस्त्यावर सोडलं होतं
- शेतकऱ्यांच्या नावानं व्यापारीकरण खपवून घेतलं जाणार नाही