आपले सरकार पाच वर्षे टिकणार

By Admin | Published: February 7, 2017 04:46 AM2017-02-07T04:46:13+5:302017-02-07T04:46:13+5:30

आपल्या सरकारला पाच वर्षे कुठलाही धोका नाही, असे सांगतानाच मुंबई महापालिकेत भाजपाची स्वबळावर सत्ता नक्कीच येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्यक्त केला.

Our government will last for five years | आपले सरकार पाच वर्षे टिकणार

आपले सरकार पाच वर्षे टिकणार

googlenewsNext

मुंबई : आपल्या सरकारला पाच वर्षे कुठलाही धोका नाही, असे सांगतानाच मुंबई महापालिकेत भाजपाची स्वबळावर सत्ता नक्कीच येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्यक्त केला.
हिंदी भाषिक पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना ते बोलत होते. फडणवीस सरकार हे नोटीस पिरियडवर असल्याचे सांगत शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी महापालिका निवडणुकीनंतर शिवसेना या सरकारचा पाठिंबा काढून घेणार असल्याचे संकेत दिले होते. याबाबत प्रतिक्रिया विचारली असता फडणवीस म्हणाले की आपले सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. जे नोटीस वगैरे बोलत आहेत त्यांच्या मतांना त्यांच्याच पक्षात कोणीही महत्त्व देत नाही.
छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची घोषणा करण्यामागे मराठी माणसांची मते मुंबईत आपल्याकडे वळविण्याचा आपला प्रयत्न होता काय या प्रश्नात ते म्हणाले की, शिवाजी महाराज हे कोण्या एका पक्षाची मक्तेदारी कसे असू शकतात? ज्या विचारधारेला आम्ही मानतो त्या विचारधारेचे शिवरायांवरील प्रेम आणि त्यांच्या प्रतीचा आदर हा शिवसेनेपेक्षा फार आधीचा आहे. मुंबईतील मराठी माणसांचा शिवसेनेबद्दल भ्रमनिरास झालेला आहे. मतांसाठी शिवसेनेला मराठी माणसांची आठवण होते आणि मोठी कंत्राटे देण्यापासून इतर कामांबाबत मात्र मराठी माणसाचा विसर पडतो, हे त्यांना कळून चुकले आहे.
निवडणुकीनंतर भाजपा आणि शिवसेना एकत्र येऊन मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करतील का या प्रश्नात ते म्हणाले की, भाजपा स्वबळावर सत्ता स्थापन करेल.
मुंबई महापालिकेत भाजपा ही शिवसेनेसोबत होती मग तेथील गैरव्यवहारांचे आरोप केवळ शिवसेनेवरच का, यावर मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही ‘मायनर पार्टनर’ होतो.
तरीही आमच्या नगरसेवकांनी त्यांच्या चुकीच्या निर्णयांविरुद्ध आवाज उठविला पण, त्यांनी कधी काँग्रेस तर कधी मनसेची मदत घेऊन प्रस्ताव मंजूर करवून घेतले. 

Web Title: Our government will last for five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.