आमचे दुकान बंद झाले, तुमचे होऊ देऊ नका!
By admin | Published: August 10, 2014 02:20 AM2014-08-10T02:20:33+5:302014-08-10T02:20:33+5:30
लोकसभा निवडणुकीत प्रचारात आपण कमी पडलो. सभांना गर्दी होत होती, लोक प्रतिसाद देत होते, मात्र निकालात चित्र उलटेच झाले.
Next
>नागपूर : लोकसभा निवडणुकीत प्रचारात आपण कमी पडलो. सभांना गर्दी होत होती, लोक प्रतिसाद देत होते, मात्र निकालात चित्र उलटेच झाले. आमचे दिल्लीतील दुकान बंद झाले. आता मुंबईवाल्यांनो तुमचे बंद होऊ देऊ नका. वेळीच जागे व्हा. आतापासून कामाला लागा. लोकसंपर्क असलेल्या व ‘इलेक्टिव्ह मेरिट’असलेल्यांना उमेदवारी द्या, कडेवर बसलेल्यांना तिकीट देऊ नका. तरच आमदार वाढतील व तुम्ही मुख्यमंत्री व्हाल, अशा शब्दात माजी खासदार विलास मुत्तेमवार, मुकुल वासनिक यांच्यासह जुन्याजाणत्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांवर नेम साधला.
काँग्रेसच्या विदर्भ विभागीय मेळाव्यात नेत्यांनी अलिकडेच केलेल्या भाषणांची राजकीय वतरुळात गेले काही दिवस चर्चा आह़े मुख्यमंत्री मेळाव्यात उशिरा पोहोचले. त्यांच्या पूर्वी जुन्याजाणत्या नेत्यांनी आपल्यासह काँग्रेसच्या सामान्य कार्यकत्र्यावर कसा अन्याय होत आहे, याचा पाढा वाचला. यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुत्तेमवार, वासनिक, पालकमंत्री नितीन राऊत यांनी रोखठोक भूमिका मांडली. मुत्तेमवार म्हणाले, राज्यात फक्त दोनच नाव समोर येतात. मुख्यमंत्री चव्हाण व प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे; ‘हम दो और हमीच दो’ असे सुरू आहे. आमची हरकत नाही. मुख्यमंत्र्यांनी पुढे येऊन नेतृत्व करावे. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिल्ली काबीज केली, आता त्यांना आर्थिक राजधानी मुंबई काबीज करायची आहे, हे ध्यानात ठेवा. लोक म्हणतात, मुख्यमंत्री प्रामाणिक आहेत. पण आपले पंतप्रधानही प्रामाणिक होते. निकालात काय झाले? याचा विचार करा. त्यामुळे आता तिकीट देताना जवळचा, दूरचा असे लाड करू नका, कार्यकत्र्याना न्याय द्या, अशी भूमिका त्यांनी मांडली.
मुकुल वासनिक म्हणाले, नेत्यांमध्ये पराभवाची खंत दिसत नाही. असे बोलले जाते की, काही मंत्री मुख्यमंत्र्यांपासून दूर आहेत. काही आमदार मंत्र्यांपासून दूर आहेत. ही परिस्थिती सुधारली नाही तर वेळ हातून जाईल, असा सूचक इशारा त्यांनी दिला. पक्षातील व शासकीय पदे लोकसभा व विधानसभा लढलेल्या उमेदवारांच्या शिफारशीनेच दिले जातात. असेच होत राहिले तर नवे कार्यकर्ते कसे जुळतील. लोकसभेच्या पराभवाची अनेक कारणो असली तरी, कार्यकत्र्याना शासनात भागीदारी मिळाली नाही, हे देखील एक महत्त्वाचे कारण असल्याचे सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर नेम साधला.
पालकमंत्री नितीन राऊत म्हणाले, कठीण परिस्थितीत विदर्भ नेहमी काँग्रेसला साथ देतो. मात्र, नेत्यांनी विदर्भाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. विदर्भातील कार्यकत्र्याचा शासनदरबारी सन्मान व्हावा.
वेगळ्या विदर्भाच्या मागणीचा सन्मान करा, असेही ते म्हणाले. विधानसभेचे उपाध्यक्ष वसंत पुरके म्हणाले, सत्ता मिळाल्यानंतरही नेत्यांनी सामान्यासारखे वागले पाहिजे. सहज उपलब्ध होणारी लीडरशिप हवी. नाराजीतून बाहेर गेलेली माणसे जवळ आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आ. हरिभाऊ राठोड म्हणाले, राज्य सरकारने घेतलेले लोकहिताचे निर्णय आता समोर येत आहेत.
च्मेळाव्यात माजी खा. दत्ता मेघे यांच्या भाजपा प्रवेशाबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. वसंत पुरके म्हणाले, काही लोक पदाशिवाय जगू शकत नाही. सुरुवात काँग्रेसपासून झाली. राष्ट्रवादीत गेले. पुन्हा काँग्रेसमध्ये आले. आता भाजपामध्ये गेले. अशा नेत्यांचा हिशेब करा, असे आवाहन त्यांनी केले.
च्विलास मुत्तेमवार यांनीही मेघेंवर नेम साधला. काँग्रेसने मेघेंना सर्वकाही दिले तरी भाजपात गेले. आता तिकडेही वाईट गत आहे, अशी टीका त्यांनी केली.