आमचं गाव- आमचा विकास : दांडीबाजांवर आॅन दि स्पॉट कारवाई

By admin | Published: July 18, 2016 08:04 PM2016-07-18T20:04:16+5:302016-07-18T20:04:16+5:30

गावाला विकासात्मक मॉडेल बनविण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने सुरू केलेल्या ह्यआमचं गाव- आमचा विकासह्ण या उपक्रमाला गांभीर्याने न घेणाऱ्या दांडीबाज कर्मचाऱ्यांवर

Our Village- Our Development: On-the-Spot Action on Dakhisar | आमचं गाव- आमचा विकास : दांडीबाजांवर आॅन दि स्पॉट कारवाई

आमचं गाव- आमचा विकास : दांडीबाजांवर आॅन दि स्पॉट कारवाई

Next

ऑनलाइन लोकमत

वाशिम, दि. १८ -  गावाला विकासात्मक मॉडेल बनविण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने सुरू केलेल्या ह्यआमचं गाव- आमचा विकासह्ण या उपक्रमाला गांभीर्याने न घेणाऱ्या दांडीबाज कर्मचाऱ्यांवर वॉच ठेवण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने भरारी पथकाचे गठण केले आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या पथकाचे नेतृत्त्व स्वत:कडे ठेवले असून, मदतीसाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी व विभाग प्रमुखांचेही स्वतंत्र पथक कार्यान्वित केले आहे.
१४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून गावांचा सर्वांगीन विकास साधण्यासाठी शासनाने ग्रामपंचायतींना थेट निधी देण्याचे धोरण अवलंबिले आहे. पुढील चार वर्षे ग्रामपंचायतींना विकासात्मक कामांसाठी लोकसंख्येच्या प्रमाणानुसार लाखो रुपयांचा निधी मिळणार आहे. या निधीतून गावात कोणकोणती कामे करता येईल, याचा आराखडा ग्रामपंचायतींना गावकऱ्यांच्या सहकार्यातून व विश्वासातून तयार करावा लागणार आहे. आराखडा तयार करण्यासाठी ग्रामपंचायतींना मदत म्हणून जिल्ह्यात मास्टर ट्रेनरच्या नियुक्त्याही करण्यात आल्या आहेत. प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर तीन दिवशीय कार्यशाळा, प्रशिक्षण आयोजित करण्याचे निर्देशही मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी दिलेले आहेत. ३१ जुलैपर्यंत जिल्ह्यातील ३९१ ग्रामपंचायतींनी कार्यशाळा, प्रशिक्षणाचा टप्पा पूर्ण करण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. काही ठिकाणी कार्यशाळा, प्रशिक्षणाला कर्मचारी विलंबाने हजर राहतात, कधी-कधी ग्रामसेवकांसह अन्य कर्मचारी हजरच नसतात, आदी प्रकारच्या तक्रारी जिल्हा परिषद प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी भरारी पथकांचे गठण केले असून, कामचुकार व दांडीबाज कर्मचाऱ्यांवर आॅन दी स्पॉट कारवाई करण्याचे अधिकार या पथक प्रमुखाला दिले आहेत. तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाठिवर कौतुकाची थाप मारण्याच्या सूचनाही दिल्या. शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे ही प्रशिक्षणे होत नसल्याचे भरारी पथकाच्या निदर्शनास आल्यास 'आॅन दि स्पॉट' कारवाई केली जाणार आहे, असे गणेश पाटील यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले.

Web Title: Our Village- Our Development: On-the-Spot Action on Dakhisar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.