शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाचे काम वर्षभर
By admin | Published: August 1, 2015 01:03 AM2015-08-01T01:03:44+5:302015-08-01T01:03:44+5:30
राज्यातील शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाचे काम संपलेले नसून हे काम वर्षभर सुरु राहणार आहे. राज्यात सव्वा दोन कोटी विद्यार्थी शाळेत शिक्षण घेत आहेत, या विद्यार्थ्यांच्या शिक्षण विभागाची
मुंबई : राज्यातील शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाचे काम संपलेले नसून हे काम वर्षभर सुरु राहणार आहे. राज्यात सव्वा दोन कोटी विद्यार्थी शाळेत शिक्षण घेत आहेत, या विद्यार्थ्यांच्या शिक्षण विभागाची प्राथमिकता असून शाळाबाह्य मुलांना शोधण्याचे कामही शिक्षण विभाग करीत असल्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. तावडे म्हणाले की, राष्ट्रीय अभ्यासक्रमानुसार ज्या मदरशांमध्ये अथवा शाळांमध्ये गणित, विज्ञान आणि समाजशास्त्र हे विषय शिकविण्यात येत नाही, त्या शाळा आणि मदरशांमध्ये हे विषय शिकविण्यासाठी प्राधान्य देण्यात येतील. तसेच उर्दू शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देऊन त्या शिक्षकांना हे विषय मदरशांमध्ये शिकविण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येईल.