आरबीआयबाहेरील रांगा संपेनात

By admin | Published: March 31, 2017 04:22 AM2017-03-31T04:22:47+5:302017-03-31T06:32:06+5:30

नोटाबंदीवेळी परदेशात असलेल्या नागरिकांना जुन्या पाचशे आणि एक हजार रुपये किमतीच्या नोटा बदलण्यासाठी

In the outline of the RBI Range | आरबीआयबाहेरील रांगा संपेनात

आरबीआयबाहेरील रांगा संपेनात

Next

मुंबई : नोटाबंदीवेळी परदेशात असलेल्या नागरिकांना जुन्या पाचशे आणि एक हजार रुपये किमतीच्या नोटा बदलण्यासाठी शुक्रवारी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे गेले दोन दिवस आरबीआयबाहेर नागरिकांनी लांबच लांब रांग लावल्याचे पाहायला मिळाले. ही सवलत नोटाबंदीच्या काळात परदेशात गेलेल्या भारतीयांसाठी उपलब्ध करून देण्यात आली असली तरी सर्वसामान्य नागरिकदेखील नोटा बदलण्यासाठी रांगेत उभे राहत असल्याने आरबीआयबाहेर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने आरबीआयबाहेर नोटा बदलण्यासाठी नागरिक भलीमोठी रांग लावत आहेत. याआधी आरबीआयने जुन्या पाचशे आणि एक हजार रुपये किमतीच्या नोटा बदलण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना ३१ डिसेंबर २०१६ पर्यंतची मुदत दिली होती. नोटाबंदीच्या काळात परदेशात असलेल्या नागरिकांना शुक्रवारी संध्याकाळपर्यंत नोटा बदली करता येणार आहेत. सोबतच सर्वसामान्य नागरिकांना प्रतिज्ञापत्रासह नोटा बदलून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अनिवासी भारतीयांसाठी मात्र ही मुदत ३० जूनपर्यंत आहे.

स्वत:च्याच पैशांची चोरी!
मर्चंट नेव्हीमध्ये काम करणाऱ्या एका नागरिकाने आरबीआयच्या नियमांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. घर खरेदी करण्यासाठी घरातील तिजोरीत पैसे जमा करून ठेवले होते. मात्र, जहाजावर असल्याने गेल्या चार महिन्यांहून अधिक काळ बाहेरगावी होतो. माघारी परतल्यानंतर तिजोरीतील पैसे बदलण्यासाठी आरबीआयमध्ये आल्यानंतर पैसे बदलून देण्यास बँक प्रशासन नकार देत आहे. पुरावा म्हणून जवळ पासपोर्ट असला तरी केवळ परदेशात घेऊन गेलेल्या नोटाच बदलून मिळतील, असे उत्तर अधिकारी देत आहेत. त्यामुळे स्वत:जवळ कष्टाचे पैसे बाळगण्याचीही चोरी असल्याची खंत या नागरिकाने नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली.

महत्त्वाची बाब म्हणजे आरबीआयला रांगेत उभे असलेल्या नागरिकांना योग्य मार्गदर्शन करण्यात अपयश येत असल्याचे दिसत आहे. कारण सर्वसामान्य नागरिकही रांगेत दिसत आहेत. सकाळपासून सायंकाळपर्यंत रांगा लावल्यानंतर नोटा बदलून मिळत नसल्याने सामान्य नागरिकांमध्ये आरबीआयविरोधात रोष व्यक्त केला जात आहे.

Web Title: In the outline of the RBI Range

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.