बँकेची थकबाकी ६५७ कोटींवर

By admin | Published: February 5, 2017 01:38 AM2017-02-05T01:38:19+5:302017-02-05T01:38:19+5:30

जिल्हा मध्यवर्ती बँकेची बिगरशेतीसाठी दिलेली ६५६ कोटी ४२ लाख ८५ हजार रुपये इतकी रक्कम २७ संस्थांकडे थकली असून ती रक्कम भरणा होत नसल्याने बँकेपुढील अडचणी

The outstanding balance of the bank is 657 crores | बँकेची थकबाकी ६५७ कोटींवर

बँकेची थकबाकी ६५७ कोटींवर

Next

- अरुण बारसकर, सोलापूर

जिल्हा मध्यवर्ती बँकेची बिगरशेतीसाठी दिलेली ६५६ कोटी ४२ लाख ८५ हजार रुपये इतकी रक्कम २७ संस्थांकडे थकली असून ती रक्कम भरणा होत नसल्याने बँकेपुढील अडचणी वाढत आहेत. याशिवाय शेती-पिकांसाठी दिलेली ६३८ कोटी इतकी रक्कमही ८० हजार शेतकरी भरण्यास तयार नसल्याने थकबाकीचा आकडा वरचेवर वाढतच आहे.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने खासगी व संचालक मंडळाच्या उद्योगासाठी भरमसाट कर्ज दिल्याने बँकेसमोर आव्हानांचे डोंगर उभे झाले आहेत. घेतलेल्या कर्जाचे मुद्दल व व्याज भरण्याची मानसिकता या संस्थांची नाही. त्यातच दोन वर्षे दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांचीही थकबाकी वाढली आहे. यंदा पाऊस चांगला पडला खरा, परंतु कर्जाचे पुनर्गठण करण्याचा निर्णय झाल्याने बँकेची वसुली झाली नाही. दुसरीकडे नोटाबंदीमुळे तीन महिने बँकेची वसुली ठप्प झाली. शेतकऱ्यांकडून पैसे भरले जात नाहीत व कर्ज भरणा केला तर बँकेकडे देण्यासाठी पैसे नाहीत. यामुळे संपूर्ण व्यवहार तीन महिन्यांपासून बंद आहेत. जिल्हाभरातील ८० हजार शेतकऱ्यांकडे डिसेंबर २०१६ अखेर ६३८ कोटी इतकी थकबाकी आहे. तर थकबाकीदार २७ संस्थांमध्ये बार्शीच्या आर्यन शुगरकडे सर्वाधिक १४५ कोटी ८७ लाख ६२ हजार थकबाकी आहे.

डिसेंबर २०१६ अखेर थकबाकी
शिवरत्न उद्योग समूह - १२५ कोटी ४४ लाख ४१ हजार
शिवरत्न शिक्षण संस्था १२ कोटी २५ लाख
पांडुरंग प्रतिष्ठान - २१ कोटी ३६ लाख
शरद सह. सूतगिरणी - १८ कोटी

साखर कारखान्यांकडील थकबाकी
सांगोला - ७३ कोटी ९२ लाख १३ हजार
स्वामी समर्थ - ७५ कोटी ५६ लाख ६३ हजार
आदित्यराज शुगर - ३८ कोटी १४ लाख ५६ हजार
शंकर - ३७ कोटी २४ लाख ६७ हजार
संत कूर्मदास - १९ कोटी ९५ लाख ३८ हजार
इंडियन शुगर - १० कोटी ४९ लाख
संत दामाजी - १२ कोटी ५७ लाख

Web Title: The outstanding balance of the bank is 657 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.