दहा दिवसांत १ लाख ३१ हजार भाविकांनी केला रेल्वेने प्रवास
By appasaheb.patil | Published: July 23, 2019 12:58 PM2019-07-23T12:58:45+5:302019-07-23T13:04:42+5:30
आषाढी यात्रा सोहळा : मध्य रेल्वेच्या चौतीस विशेष गाड्यांनी पूर्ण केल्या १२६ फेºया
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : ‘जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता’ अशी आर्त विनवणी विठुरायाला करीत पंढरीतून भाविक परतू लागले आहेत.मागील दहा दिवसात रेल्वेतून १ लाख ३१ हजार ३५३ प्रवाशांनी प्रवास केला आहे़ या प्रवाशांच्या माध्यमातून मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागाला १ कोटी २ लाख ९० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक प्रदीप हिरडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता लाखो वारकरी पायी पंढरीची वारी नित्यनियमाने करतात. यंदाच्या आषाढी यात्रेला राज्यासह देशातून लाखो भाविक पंढरीत दाखल झाले होते. या वर्षी सर्वदूर पावसाने चांगली हजेरी लावली. त्यामुळे मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मुंबई आणि कोकणातून भाविक पेरणीची कामे उरकून पंढरीच्या वारीला आले होते. सावळ्या विठुरायाचे दर्शन घेऊन भाविक समाधानी झाले. येथील प्रसाद म्हणून कुंकू, बुक्का आणि चुरमुरे तसेच देवदेवतांचे फोटो तसेच तुळशीमाळा खरेदी करून भाविक परतू लागले. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने ७ ते १६ जुलै या दहा दिवसात विविध गाड्यांसह विशेष गाड्या पंढरपूर रेल्वे स्थानकावरून सोडल्या होत्या़ वारकºयाची अडचण निर्माण होऊ नये, यासाठी ११ तिकीट खिडक्या सुरू ठेवण्यात आल्या होत्या, अशीही माहिती हिरडे यांनी दिली.
दोन दिवसांत मिळाले ४८ लाखांचे उत्पन्न
- आषाढी एकादशीसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने केलेल्या नियोजनामुळे राज्यभरातून आलेल्या वारकºयांना सुखरूप प्रवास अनुभवता आला़ आषाढी एकादशीच्या सोहळ्यादिवशी म्हणजे १२ जुलै रोजी २८ हजार ५५० वारकरी व १३ जुलै रोजी ३२ हजार २८० वारकºयांनी पंढरपुरातून प्रवास केला़ या दोन दिवसात रेल्वेला ४८ लाख ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले़
३४ गाड्यांच्या झाल्या १२६ फेºया
- पंढरपुरातील आषाढी एकादशी सोहळ्यासाठी भारतातील विविध भागातून भाविक विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात़ प्रत्येक भाविकाची सोय व्हावी, यासाठी मध्य रेल्वेने १६ रेल्वे गाड्यांचे नियोजन केले होते़ त्यात बहुतांश विशेष गाड्यांचाही देखील समावेश होता़ या ३४ गाड्यांनी १० दिवसात १२६ फेºया पूर्ण केल्याची माहिती वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक प्रदीप हिरडे यांनी दिली़
२० तिकीट चेकर, २५ आरपीएफचे जवान
- प्रवास करताना विनातिकीट प्रवास करणाºया प्रवाशांवर कारवाई करण्याच्या उद्देशाने मध्य रेल्वेच्या सोलापूर मंडलातील २५ तिकीट चेकिंग अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली होती़ शिवाय प्रवाशांना कोणत्याही अडचणी निर्माण होऊ नये, सुरक्षित प्रवास घडावा, यासाठी २५ आरपीएफ जवान पंढरपूर रेल्वे स्थानकावर तैनात करण्यात आले होते़
यंदा आषाढीसाठी मध्य रेल्वेचे सोलापूर मंडलाचे विभागीय व्यवस्थापक हितेंद्र मल्होत्रा यांच्या मार्गदर्शनाखाली ३४ गाड्यांचे नियोजन केले होेते़ या विशेष गाड्यांनी १२६ फेºया केल्या़ त्यातून रेल्वेला १ कोटी २ लाख ९० हजारांचे उत्पन्न मिळाले़ पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांस जलद, सुखकर व आरामदायी प्रवास घडविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अहोरात्र कष्ट घेतले़.
- प्रदीप हिरडे
वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक,सोलापूर मंडल