राज्यभरात ११ लाख विद्यार्थ्यांनी दिली कलचाचणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 01:35 AM2019-01-04T01:35:54+5:302019-01-04T01:36:28+5:30

दहावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणवाटा निवडणे सोपे जावे यासाठी शिक्षण विभागाने सुरू केलेल्या कलचाचणीला राज्यभरात सुरुवात झाली. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

Over 11 lakh students of the state have given test | राज्यभरात ११ लाख विद्यार्थ्यांनी दिली कलचाचणी

राज्यभरात ११ लाख विद्यार्थ्यांनी दिली कलचाचणी

Next

मुंबई : दहावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणवाटा निवडणे सोपे जावे यासाठी शिक्षण विभागाने सुरू केलेल्या कलचाचणीला राज्यभरात सुरुवात झाली. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. २ जानेवारीपर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्यात ११ लाख ५७ हजार ३३२ विद्यार्थ्यांनी चाचणी दिली.
परीक्षेसाठी ३ लाख ७० हजारपेक्षा जास्त मोबाइल फोन वापरण्यात आले आहेत. यामध्ये पुणे आघाडीवर असून तिथे तब्ब्ल १ लाख ९२ हजार ६६२ विद्यार्थ्यांनी ही चाचणी दिली आहे. तर मुंबईतील १ लाख
८० हजार ७०१ विद्यार्थ्यांनी चाचणी दिली आहे. यंदा प्रथमच ही कलमापन चाचणी महाकरिअर मोबाइल अ‍ॅपद्वारे घेण्यात येत आहे. आत्तापर्यंत २० हजार २२१ शाळांनी कलचाचणीसाठी नोंदणी केल्याची माहिती मिळाली.
शिक्षण विभागातर्फे तीन वर्षांपासून शालेय विद्यार्थ्यांची कल व अभिक्षमता चाचणी घेण्यात येत आहे. या चाचणीला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु अनेक विद्यार्थ्यांसाठी इंटरनेट व कॉम्प्युटरची समस्या असल्याने या वर्षी प्रथमच ही चाचणी श्यामची आई फाउंडेशन, पुणे विद्यापीठाचा मानसशास्त्र विभाग, व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन विभाग यांच्या सहकार्याने ‘महाकरिअरमित्र’ पोर्टल व मोबाइल अ‍ॅपवर उपलब्ध करून दिली आहे. १८ डिसेंबर २0१८ पासून राज्यातील विविध शाळांमध्ये ही चाचणी परीक्षा सुरू करण्यात आली. मोबाइलवर ही चाचणी घेण्यात आल्याने विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या चाचणीला मिळत आहे. पुणे, मुंबईनंतर नाशिक १ लाख ५९ हजार ४५७ तर सर्वांत कमी कोकण भागातून २५ लाख ६३४ विद्यार्थ्यांनी चाचणी दिली. कलचाचणी देणारे सर्वाधिक विद्यार्थी हे भंडारा जिल्ह्यातील असून कलचाचणी देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुंबईची (डीवायडी) टक्केवारी सर्वांत कमी आहे.
२३ जानेवारीपर्यंत शाळांमध्ये कल आणि अभिक्षमता चाचणी घेण्यात येणार आहे. गेल्या वर्षी २०१७-१८ या शैक्षणिक वर्षामध्ये दहावीच्या १७ लाख ३६ हजार १०४ विद्यार्थ्यांनी कलचाचणी दिली होती. गेली तीन वर्षे ही चाचणी संगणकाच्या आधारे घेण्यात येत होती. मात्र यंदा श्यामची आई फाउंडेशन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभाग व व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन विभाग यांच्या सहकार्याने तयार करण्यात आलेली अभिक्षमता चाचणी विद्यार्थी मोबाइल अ‍ॅपद्वारे देत आहेत.

विभाग कलचाचणी पूर्ण
झालेले विद्यार्थी
पुणे १,९२,६६५
नागपूर १,२०,५४४
औरंगाबाद १,४२,०५२
मुंबई १,८०,७०१
कोल्हापूर १,२२,०५९
अमरावती १,२९,६८७
नाशिक १,५९,४५७
कोकण २५,६३४
एकूण ११,५७,३३२

Web Title: Over 11 lakh students of the state have given test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.