१३९ वरही रेल्वे तिकीट रद्द होऊ शकणार

By admin | Published: June 4, 2016 03:30 AM2016-06-04T03:30:37+5:302016-06-04T03:30:37+5:30

रेल्वे क्रमांक १३९ वर तिकीट केंद्रावर काढलेली मेल-एक्सप्रेसची आरक्षित तिकिटे,रद्द झालेल्या तिकिटांवर आरक्षित झालेली तिकीटे(आरएसी) व प्रतिक्षायादीतील तिकिटे रद्द करण्याची सुविधा सुरु करण्यात

Over 139 Railway tickets can be canceled | १३९ वरही रेल्वे तिकीट रद्द होऊ शकणार

१३९ वरही रेल्वे तिकीट रद्द होऊ शकणार

Next

मुंबई : रेल्वे क्रमांक १३९ वर तिकीट केंद्रावर काढलेली मेल-एक्सप्रेसची आरक्षित तिकिटे,रद्द झालेल्या तिकिटांवर आरक्षित झालेली तिकीटे(आरएसी) व प्रतिक्षायादीतील तिकिटे रद्द करण्याची सुविधा सुरु करण्यात आल्याची माहीती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली. आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरुनही ही तिकीटे रद्द करता येऊ शकतील. ही सुविधा देशभरातील रेल्वेत सुरु करण्यात आली आहे. ही तिकीटे रद्द करताना काही अटीही घालण्यात आल्या आहेत. रद्द झालेल्या ट्रेनमध्ये किंवा उशिराने धावणाऱ्या गाड्यांमध्ये अशाप्रकारचे तिकीट रद्द करता येणार नाही. तिकीटांसाठी अर्ज भरताना मोबाईल क्रमांक देणे आवश्यक असून त्यामुळेच तिकीट रद्द करता येऊ शकेल, असे सांगण्यात आले.
ट्रेन सुटण्याच्या चार तासांच्या आत आरक्षित तिकीट रद्द करता येईल तर प्रतिक्षा (वेटिंग) यादीतील आणि आरएसी तिकीटे रद्द करण्यासाठी ट्रेन सुटण्याआधी किमान अर्धा तासाची अट आहे. मूळ तिकीटे रद्द केल्यानंतच तिकीटांच्या ऊर्वरीत रक्कमेचा परतावा जमा होईल. वेबसाईटवरुन तिकीट रद्द करताना आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर नवीन पेज देण्यात आले असून त्याचा वापर तिकीट रद्द करण्यासाठी करता येईल. (प्रतिनिधी)

Web Title: Over 139 Railway tickets can be canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.