महाराष्ट्रात ३ कोटींवर जन-धन खाती; प्रत्येक खात्यात सरासरी ३२५२ रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 06:17 AM2021-08-10T06:17:51+5:302021-08-10T06:18:58+5:30

अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांची माहिती

Over 3 crore jan dhan accounts in Maharashtra | महाराष्ट्रात ३ कोटींवर जन-धन खाती; प्रत्येक खात्यात सरासरी ३२५२ रुपये

महाराष्ट्रात ३ कोटींवर जन-धन खाती; प्रत्येक खात्यात सरासरी ३२५२ रुपये

Next

- नितीन अग्रवाल 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांत आवडत्या आर्थिक योजनांपैकी एक असलेल्या जन-धन योजनेंतर्गत महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण ३.०३ कोटींपेक्षा अधिक खाते उघडण्यात आले आहेत. यात ९८५६ कोटींपेक्षा अधिक रक्कम आहे. 

अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी सांगितले की, राज्यात पंतप्रधान जन-धन योजनेंतर्गत एकूण ३,०३,०७,१३९ खाते उघडण्यात आले आहेत. २१ जुलैपर्यंत प्रत्येक जन-धन खात्यात सरासरी ३२५२ रुपये याप्रमाणे एकूण ९८५६ कोटी रुपये रक्कम जमा होती. 

राजन विचारे यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. कराड यांनी सांगितले की, सर्व गावांच्या ५ किमीच्या क्षेत्रात बँकिंग सुविधा देण्यासाठी राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राने जन-धन दर्शक नावाचे एक जीआयएस आधारित ॲप सुरू केले आहे. या ॲपमध्ये ५.५३८ लाख गावांपैकी ५.५३५ लाख गावांतील पाच किमीच्या क्षेत्रातील बँकिंग अकाउंट उपलब्ध आहेत. 

ठाणे जिल्ह्यात १९ लाखांवर खाते असून यात ६५८ कोटी रुपये आहेत. सरासरी रक्कम ३३१५ आहे. नाशिक जिल्ह्यात १९ लाखांवर खाते आहेत. यात ७६४ कोटी रुपये असून सरासरी ३८६४ रुपये आहेत. पुणे जिल्ह्यात १६ लाख खाते असून ८२८ कोटी रुपये आहेत. सरासरी रक्कम ५११६ आहे. सोलापुरात १४ लाखांवर खाते असून ४५२ कोटी रुपये आहेत. अहमदनगरमध्ये १३ लाखांवर खाते आणि ४७३ कोटी रुपये आहेत. नांदेडात १३ लाखांवर खाते आणि ३३२ कोटी रुपये आहेत. जळगावमध्ये १२ लाखांवर खाते आणि ३२३ कोटी रुपये आहेत. औरंगाबादेत १२ लाखांवर खाते आणि ३३९ कोटी रुपये आहेत. कोल्हापुरात ११ लाखांवर खाते असून ३६० कोटी रुपये आहेत. महाराष्ट्रात एकूण ३ कोटींवर खाते असून ९८५६ कोटी रुपये खात्यात आहेत. याची सरासरी ३२५२ रुपये आहे. 

सर्वाधिक खाती ९ ठिकाणी 
लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सर्वाधिक खाते ठाणे, नाशिक, पुणे, सोलापूर, अहमदनगर, नांदेड, जळगाव, औरंगाबाद आणि कोल्हापूर येथे उघडण्यात आले आहेत. 

खात्यात जमा रकमेबाबत पुणे, नाशिक, ठाणे, अहमदनगर, सोलापूर, नागपूर, बीड, कोल्हापूर आणि औरंगाबाद सर्वांत पुढे आहे, तर सरासरी सर्वांत अधिक रक्कम सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, रायगड, उस्मानाबाद, भंडारा, वर्धा आणि गडचिरोलीच्या जन-धन खात्यात आहे. 

Web Title: Over 3 crore jan dhan accounts in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.