येत्या २ दिवसांत कोकणात अतिवृष्टी
By admin | Published: September 18, 2015 12:48 AM2015-09-18T00:48:29+5:302015-09-18T00:56:18+5:30
दक्षिण ओडिसा व लगतच्या भागावरील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली असून ते आता विदर्भ आणि दक्षिण छत्तीसगडच्या लगतच्या भागाकडे सरकले आहेत.
पुणे : दक्षिण ओडिसा व लगतच्या भागावरील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली असून ते आता विदर्भ आणि दक्षिण छत्तीसगडच्या लगतच्या भागाकडे सरकले आहेत. येत्या दोन दिवसात, कोकणात अतीवृष्टी तर उर्वरित महाराष्ट्रातही जोरादार पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
गेल्या २४ तासात विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. तर कोकण; मध्यमहाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडला. पावसाचा जोर विदर्भात कायम असून गुरूवारी ही जोरदार पाऊस पडला. गुरूवारी सायंकाळी ५.३० पर्यंत वर्धा येथे सर्वाधिक ७४ मिमी पाऊस पडला आहे. तर अकोला येथे २१ मिमी, अमरोती येथे ४९ मिमी, बुलढाणा येथे २२ मिमी, ब्रह्मपुरी येथे २२ मिमी, चंद्रपूर येथे ५५ मिमी, गोंदीया येथे९ मिमी, नागपूर येथे ३६ ममी, वाशिम येथे ६२ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तर गुरूवारी सकाळपर्यत विदर्भात काही सिडक अर्जुनी येथे १४० मिमी, गोरेगाव कोपर्णा, मुल येथे १२० मिमी पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान, राजस्थान, पंजाब, हरियाणाच्या काही भागातून परतलेला नैॠत्य मोसमी पावसाचा मुक्काम अद्यापही तेथेच आहे. तसेच विदर्भाकडे सरकलेला कमी दाबाचा पट्टा यामुळे येत्या २ दिवसात राज्यात पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. शुक्रवारी कोकणात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.
(प्रतिनिधी)