दोन हजारांहून अधिक औषध दुकानांचे परवाने रद्द

By admin | Published: May 3, 2015 05:15 AM2015-05-03T05:15:37+5:302015-05-03T05:15:37+5:30

प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे विकणाऱ्या २ हजार २४१ औषध दुकानांचे परवाने अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) गेल्या एका वर्षभरात रद्द केले आहेत.

Over two thousand drug shops have been canceled | दोन हजारांहून अधिक औषध दुकानांचे परवाने रद्द

दोन हजारांहून अधिक औषध दुकानांचे परवाने रद्द

Next

मुंबई : प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे विकणाऱ्या २ हजार २४१ औषध दुकानांचे परवाने अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) गेल्या एका वर्षभरात रद्द केले आहेत.
औषध आणि सौंदर्यप्रसाधन कायद्यान्वये डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधे विकण्यास परवनागी नाही. औषधांच्या दुकानदारांनी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधे विकणे हा गुन्हा आहे. हे माहीत असूनही औषध दुकानदार औषधे विकत असल्याचे एफडीएने केलेल्या कारवाईत आढळून आले आहे. एप्रिल २०१४ ते फेब्रुवारी २०१५ या कालावधीत एफडीएने २४ हजार ९१३ औषधांच्या दुकानांची तपासणी केली आहे. औषधांची दुकाने नियमांचे पालन करतात की नाही, हे शोधून काढण्यासाठी एफडीएने केलेल्या तपासात ४ हजार ४०३ दुकानांमध्ये नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आले होते.

Web Title: Over two thousand drug shops have been canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.