लातूरकरांच्या घशाची कोरड दूर करण्यासाठी पाण्याची रेल्वे मिरजेत दाखल
By Admin | Published: April 10, 2016 01:17 PM2016-04-10T13:17:43+5:302016-04-10T13:21:53+5:30
पिण्याच्या पाण्यासाठी तडफडणाऱ्या लातूरकरांची तहान भागवण्यासाठीची पाण्याची रेल्वे आज मिरजेत दाखल झाली.
ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 10- मराठवाडा पाणीटंचाईमुळे बेजार झाला आहे. मात्र सरकारनं लातूरकरांना काहीसा दिलासा दिला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी तडफडणाऱ्या लातूरकरांची तहान भागवण्यासाठीची पाण्याची रेल्वे आज मिरजेत दाखल झाली.
वारणा धरण ते मिरज रेल्वे स्टेशन यादरम्यानची पाईपलाईन अद्याप तयार झाली नसल्यानं रेल्वेनं दुसऱ्या मार्गाची चाचपणी सुरू केली आहे. आता त्याऐवजी रेल्वे जंक्शनमध्ये ज्या पाईपलाईनद्वारे पाणी येतं, तिथूनच पाणी नेण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. हा प्रयत्न पूर्णत्वास नेऊन आजच लातूरसाठी रेल्वे रवाना करण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार आहे.
आज सकाळी 50 वॅगन असलेली रेल्वे गाडी मिरजेत दाखल झाली. साधारण 10 वॅगन पाणी भरून आज पहिली रेल्वे लातूरला रवाना होण्याची शक्यता आहे.