अंगणवाडी बालकांना दिला ‘ओव्हर डोस’
By admin | Published: February 11, 2016 01:28 AM2016-02-11T01:28:55+5:302016-02-11T01:28:55+5:30
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील अंगणवाडीतील बालकांना ओव्हर डोस (अतिरिक्त मात्रा) देण्यात आला. यामुळे १२ बालकांना त्रास होऊ लागल्याने त्यांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील अंगणवाडीतील बालकांना ओव्हर डोस (अतिरिक्त मात्रा) देण्यात आला. यामुळे १२ बालकांना त्रास होऊ लागल्याने त्यांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सकाळी १० च्या सुमारास ही घटना घडली. या बालकांवर तातडीने उपचार सुरु केल्याने धोका टळला आहे.
मंगळवारी सकाळी दहा ते ११ च्या सुमारास अंगणवाडी सेविकेने अंगणवाडीतील बालकांना जंतनाशक गोळ्या देण्यापूर्वी देण्यात येणाऱ्या औषधाची अतिरिक्त मात्रा (ओव्हरडोस) दिल्याने मुलांना त्रास होऊ लागला. तातडीने त्यांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार
सुरु असलेल्या मुलांमध्ये गौतमी तुकाराम निकंबे , दर्शनी तुकाराम निकंबे, सबा राजू जमादार, समद अलताप मुजावर , राहुल गजानन चांगले , सोहम विठ्ठल वाघमारे , विशाल विठ्ठल शिवशेट्टी , समर्थ सिद्धाराम देवरे, सोनाली गेनसिद्ध चांगले , चंद्रकांत मलकारी बिराजदार , सृष्टी मलकारी बिराजदार, विजय विठ्ठल शिवशेट्टी या १२ बालकांचा समावेश आहे. ही सर्व मुले ४ ते ७ वयोगटातील आहेत़ (प्रतिनिधी)
काय आहे औषध
आयर्न फॉलीक अॅसिड ड्रॅप्स असे त्या औषधाचे नाव असून १५ एमएलची बाटली आहे. यापैकी केवळ पाच एमएल वा त्याहून कमी प्रमाणात हे औषध बालकांना देणे गरजेचे असताना पूर्ण बाटलीच रिकामी करण्यात आली.
मुले नेहमीप्रमाणे सकाळी अंगणवाडीत गेली होती, दुपारी १२ वाजेच्या सुमारास मुले घरी आली. त्यावेळी मुलांना उलट्यांचा त्रास होऊ लागला. अंगणवाडीतील बार्इंनी औषध दिल्यामुळे हा त्रास होऊ लागल्याचे बालकांनी सांगितले.
- जगदेवी शिवशेट्टी, पिडित बालकाची आजी