प्रतापगडावरील अनधिकृत बांधकामावर रातोरात सर्जिकल स्ट्राइक; देवेंद्र फडणवीस म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 01:24 PM2022-11-10T13:24:21+5:302022-11-10T13:25:25+5:30

१४४ कलम लागू केल्यामुळे कोणीही किल्ले प्रतापगडच्या परिसरात फिरल्यास त्यावर कडक कारवाई केली जात असल्याने परिसरात तणापूर्ण वातावरण निर्माण झाले.

Overnight surgical strike on unauthorized construction at Pratapgarh; Devendra Fadnavis said... | प्रतापगडावरील अनधिकृत बांधकामावर रातोरात सर्जिकल स्ट्राइक; देवेंद्र फडणवीस म्हणाले...

प्रतापगडावरील अनधिकृत बांधकामावर रातोरात सर्जिकल स्ट्राइक; देवेंद्र फडणवीस म्हणाले...

googlenewsNext

मुंबई - गेल्या अनेक वर्षापासून सातारा प्रतापगडावरील अफजल खानच्या थडग्याशेजारील अनधिकृत बांधकामावर प्रशासनाकडून हातोडा पडला आहे. पोलीस प्रशासनाने या परिसरात कलम १४४ लागू करून कठोर बंदोबस्त लावला होता. ४ जिल्ह्यातील १५०० पोलीस या परिसरात तैनात करण्यात आले. त्यानंतर प्रशासनाने अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे. 

या कारवाईवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजचा दिवस आपल्यासाठी अभिमानाचा आहे. आजच्या दिवशी अफजल खानाचा वध झाला होता. २००७ साली कोर्टानं या अफजल खानच्या थडग्याजवळ असलेले अनधिकृत बांधकाम काढले पाहिजे अशी नोटीस दिली होती. २०१७ मध्ये आम्ही कारवाई सुरू केली होती. परंतु त्यात पुन्हा कायदेशीर अडचणी आल्या. आता या सर्व अडचणी दूर झाल्या असून सातत्याने शिवप्रेमींची मागणी होते त्याठिकाणचं बांधकाम तोडावं. शिवप्रेमींवर गुन्हे दाखल झाले परंतु अतिक्रमण हटवलं नव्हतं. आज सगळ्यांसाठी समाधानाची गोष्ट आहे कारण त्याठिकाणचं सगळं अतिक्रमण हटवण्यात आले असं त्यांनी सांगितले. 

रातोरात हटवलं अतिक्रमण
प्रतापगड परिसरात असलेल्या अफजल खानच्या थडग्याजवळचं अनधिकृत बांधकाम पोलीस बंदोबस्तात रातोरात हटवण्यात आलं आहे. अतिक्रमण पाडण्यासाठी बुधवारी रात्रीपासूनच जोरदार तयारी सुरू झाली होती. शिंदे फडणवीस सरकारचा हा सर्जिकल स्ट्राइक मानला जात आहे. शिवप्रताप दिनी अवतीभोवती अनेक हजारोंच्या संख्येने शिवभक्त महाबळेश्वर तालुकामध्ये दाखल झाले होते. मात्र पोलिसांनी कोणासही प्रतापगड किल्ल्याच्या परिसरात फिरण्यास मनाई केली आहे.

१४४ कलम लागू केल्यामुळे कोणीही किल्ले प्रतापगडच्या परिसरात फिरल्यास त्यावर कडक कारवाई केली जात असल्याने परिसरात तणापूर्ण वातावरण निर्माण झाले. किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खान कबरीच्या जवळील बांधकाम बुधवारी रात्रीपासून पाडण्यास सुरू केल्याने प्रशासनाकडून मोठी खबरदारी घेण्यात आली. जिल्ह्यात अनुचित प्रकार घडून येत म्हणून जिल्ह्यातील सर्वच प्रार्थना स्थळ पोलीस बंदोबस्त दिला आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रतापगड परिसरात जमावबंदी १४४ कलम लागू करण्यात आले आहे. तसेच  जिल्ह्यातील मंदिरे, मस्जिद परिसरात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Overnight surgical strike on unauthorized construction at Pratapgarh; Devendra Fadnavis said...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.