लोटस पार्क आगीप्रकरणी मालक, विकासकावर गुन्हा

By admin | Published: July 24, 2014 01:42 AM2014-07-24T01:42:44+5:302014-07-24T01:42:44+5:30

अंधेरी पश्चिम येथील लोटस बिझनेस पार्कमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेला पाच दिवस उलटल्यानंतर अग्निशमन दलाच्या अधिका:यांनी आंबोली पोलीस ठाण्यात रात्री उशिरा तक्रार दाखल केली़

Owner of lotus park fire, developer crime | लोटस पार्क आगीप्रकरणी मालक, विकासकावर गुन्हा

लोटस पार्क आगीप्रकरणी मालक, विकासकावर गुन्हा

Next
मुंबई : अंधेरी पश्चिम येथील लोटस बिझनेस पार्कमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेला पाच दिवस उलटल्यानंतर अग्निशमन दलाच्या अधिका:यांनी आंबोली पोलीस ठाण्यात रात्री उशिरा तक्रार दाखल केली़ यामध्ये इमारत मालक, विकासक, भोगवटादार आणि सोसायटीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आह़े
लोटस पार्क या 22 मजल्याच्या इमारतीमध्ये शुक्रवारी भीषण आग लागली होती़ या आगीमध्ये अग्निमशन दलाचा जवान नितीन इवलेकर शहीद झाला़ तसेच 2क् अधिकारी व जवान जखमी झाले होत़े 
प्रथमदर्शी चौकशीत या इमारतीमध्ये अग्निरोधक यंत्रणा नादुरुस्त असल्याचे अग्निशमन दलास आढळून आले आह़े तरीही पालिका प्रशासनाने बचावाची भूमिका घेतली आह़े 
यावर तीव्र पडसाद उमटताच मंगळवारी रात्री उशिरा अग्निशमन दलाच्या अधिका:यांनी पोलीस ठाण्यात जाऊन एफआयआर दाखल केली़ त्यानुसार इमारत मालक, विकासक व सोसायटीवर पोलिसांनी 3क्4 ए, 338, 337 आणि 336 
कलमे लावली आहेत़ गुन्हा 
दाखल झाल्यामुळे पुढील कारवाई पोलिसांमार्फत सुरू होणार 
आह़े (प्रतिनिधी)
 
या कलमांतर्गत गुन्हा दाखल
इमारतीच्या मंजूर आराखडय़ात बदल करणो, बंद अग्निरोधक यंत्रणा, आपत्ती काळात बाहेर पडण्याचे मार्गच बंद ठेवल़े त्यामुळे आग विझविण्यास गेलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांची सुरक्षितता धोक्यात आली़ तसेच एका जवानाचा मृत्यू झाला़ या कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे अतिरिक्त आयुक्त मोहन अडताणी यांनी स्थायी समितीच्या बैठकीत सांगितल़े
 

 

Web Title: Owner of lotus park fire, developer crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.