Video: एमडीएच मसाल्याचे मालक सुषमा स्वराज यांचे पार्थिव पाहून रडू लागले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 04:46 PM2019-08-07T16:46:09+5:302019-08-07T16:53:01+5:30

भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे काल रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

owner of MDH spice company, gets emotional after paying tribute to former External Affairs Minister | Video: एमडीएच मसाल्याचे मालक सुषमा स्वराज यांचे पार्थिव पाहून रडू लागले

Video: एमडीएच मसाल्याचे मालक सुषमा स्वराज यांचे पार्थिव पाहून रडू लागले

Next

भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे काल रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या 67 वर्षांच्या होत्या. मोदी सरकारच्या दुसऱ्या इनिंगमध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यास नकार दिला होता. एम्सच्या डॉक्टरांनी काल रात्री निधन झाल्याचे सांगितले. 


स्वराज यांचा मृतदेह अंत्य दर्शनासाठी बुधवारी सकाळी भाजपा मुख्यालयामध्ये ठेवण्यात आला होता. यावेळी एमडीएचचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांनीही स्वराज यांचे अंत्यदर्शन घेतले आणि श्रद्धांजली वाहिली. मात्र गुलाटी भावूक झाले.

 


महाशय धर्मपाल गुलाटी हे सुषमा स्वराज यांचे पार्थिव पाहताच ओक्साबोक्शी रडायला लागले. आजुबाजुच्या लोकांना त्यांना सावरले. याबाबतचा व्हिडिओ एएनआयने प्रसिद्ध केला आहे. धरमपाल यांचे वय 96 वर्षे आहे. एमडीएच मसाले उद्योग त्यांनीच उभा केला होता. धर्मपाल हे जगातील सर्वात वयोवृद्ध अॅडव्हरटाईज स्टार आहेत. ते एमडीएच मसाल्याचीच जाहिरात करतात. 
 

Web Title: owner of MDH spice company, gets emotional after paying tribute to former External Affairs Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.