Video: निष्पाप मनाचा धनी... उदयनराजेंच्या डोळ्यात अश्रू, व्हिडिओ पाहताच पंकजा मुंडेही भावुक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 08:37 AM2022-08-24T08:37:00+5:302022-08-24T08:41:20+5:30

उदयनराजेंनी ट्विटर अकाऊंटवरुन व्हिडिओ शेअर करताना भावनिक कॅप्शन दिलंय.

Owner of an innocent mind... Tears in Udayanraj's eyes in front photo fo gopinath munde, Pankaja Munde also got emotional | Video: निष्पाप मनाचा धनी... उदयनराजेंच्या डोळ्यात अश्रू, व्हिडिओ पाहताच पंकजा मुंडेही भावुक

Video: निष्पाप मनाचा धनी... उदयनराजेंच्या डोळ्यात अश्रू, व्हिडिओ पाहताच पंकजा मुंडेही भावुक

googlenewsNext

मुंबई - भाजप खासदार उदयनराजे भोसले नेहमीच आपल्या हटके स्टाईलमुळे चर्चेत असतात. अनेकदा त्यांच्यातील भावूक आणि प्रेमळ व्यक्तीचेही दर्शन घडते. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या कार्यकर्त्याला वाढदिवसानिमित्त चक्क तोंडाने पेढा भरवला होता. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. आता, उदयनराजेंनी आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. उदयनराजेंनी दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडेंचा फोटो पाहताच त्यांचे दर्शन घेतले. तसेच, काही क्षण ते भावूक झाल्याचंही या व्हिडिओत दिसत आहे. या व्हायरल व्हिडिओवर आता पंकजा मुंडेंनीही भावूक प्रतिक्रिया दिली. 

उदयनराजेंनी ट्विटर अकाऊंटवरुन व्हिडिओ शेअर करताना भावनिक कॅप्शन दिलंय. तसेच, त्यांचा भावूक चेहराही व्हिडिओत दिसून येतो. संघर्षयोद्धा... 'द्वितीय आधारस्तंभ' असा शब्दात उदयनराजेंनी गोपीनाथ मुंडेंचं वर्ण केलं आहे. 'अद्वितीय आधारस्तंभ आदरणीय मुंडे साहेबांच्या आठवणी आजही डोळ्यात पाणी आणतात. त्यांच्या नसण्याची जाणीव आजही तीव्रतेने भासते', असे उदयनराजे म्हणतात. तसेच, संघर्षयोद्धा हा हॅशटॅगही त्यांनी वापरला आहे. तर, व्हिडिओच्या बॅकग्राऊण्डला गुरु एक तूची माझा विधाता, हे गाणं लावण्यात आलं आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे पंकजा मुंडेंनाही अनेकांनी हा व्हिडिओ पाठवला. त्यावर, आता पंकजाही भावूक झाल्या आहेत. 


''आज दिवसभर हा video अनेकांनी पाठवला.. व्यक्त ही झाले बरेच.. काय बोलावे आमचे भाऊ उदयनराजे निष्पाप मनाचे धनी.. मुंडे साहेबांचे नाव स्मृती मध्ये राहीलच! 40 वर्ष खस्ता खाल्ल्या, 4 दिवसात आम्ही पद घेऊ पण ती जागा घेऊ कशी ? राजेंचे अश्रू निव्वळ निष्पाप प्रेम आहे..'', असे कॅप्शन पंकजा यांनी हा व्हिडिओ रिशेअर करत दिले आहे. तसेच, उदयनराजे हे निष्पाप मनाचे धनी असल्याचंही त्यांनी म्हटलंय. 

कार्यकर्त्याने भेट दिलेला फोटो

खासदार उदयनराजे भोसले हे सोमवारी शिखर शिंगणापुर येथे देव दर्शनासाठी गेले होते. यावेळी या ठिकाणाहून परत येत असताना उदयनराजे यांनी दहिवडी येथील चैतन्य अकॅडमीला भेट दिली. यावेळी संदीप खाडे यांनी हा फोटो उदयनराजे भोसले यांना भेट दिला. हा फोटो दिल्यानंतर उदयनराजे यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं. मात्र, या क्षणी उदयनराजेंना अश्रू अनावर झाल्याचं दिसून आलं.
 

Web Title: Owner of an innocent mind... Tears in Udayanraj's eyes in front photo fo gopinath munde, Pankaja Munde also got emotional

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.