घोडागाडी मालकांची सर्वोच्च न्यायालयात धाव

By admin | Published: June 15, 2015 02:40 AM2015-06-15T02:40:10+5:302015-06-15T02:40:10+5:30

सजवलेला टांगा वा व्हिक्टोरियामधून मौजमजेसाठी फेरफटका मारणे बेकायदा असल्याचे स्पष्ट करीत त्यावर बंदी घालण्याचा आदेश मुंबई उच्च

The owners of the craft run in the Supreme Court | घोडागाडी मालकांची सर्वोच्च न्यायालयात धाव

घोडागाडी मालकांची सर्वोच्च न्यायालयात धाव

Next

मुंबई : सजवलेला टांगा वा व्हिक्टोरियामधून मौजमजेसाठी फेरफटका मारणे बेकायदा असल्याचे स्पष्ट करीत त्यावर बंदी घालण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला. मात्र न्यायालयाच्या या आदेशाला आव्हान देत व्हिक्टोरिया चालक-मालकांनी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे.
घोडागाडी बंद करण्यासंदर्भात अ‍ॅनिमल अ‍ॅण्ड बडर््स चॅरिटेबल ट्रस्ट व इतरांनी जनहित याचिका केली होती. घोडागाडी मुंबईतून हद्दपार करावी, अशी प्रमुख मागणी यात करण्यात आली होती. पागा सुस्थितीत नसतो व याने घोड्यांचेही हाल होतात, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते.
न्यायालयाच्या या आदेशानंतर ग्रँट रोड येथे नुकतीच व्हिक्टोरिया चालक-मालकांची बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी घोडागाड्या वाचविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे. व्हिक्टोरियाचा व्यवसाय पारंपरिक असून अशी बंदी आणणे चुकीचे आहे, अशी भूमिका घेत घोडागाडी चालक-मालक एकत्र आले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The owners of the craft run in the Supreme Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.