ओझोन थर घटतोय; मृत्युदर वाढतोय

By admin | Published: February 16, 2017 05:06 AM2017-02-16T05:06:04+5:302017-02-16T05:06:04+5:30

देशातील वायुप्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. वाढते प्रदूषण आणि जागतिक तापमान वाढीमुळे ओझोनचा थरही घटत आहे.

Ozone layer is decreasing; Death rates are rising | ओझोन थर घटतोय; मृत्युदर वाढतोय

ओझोन थर घटतोय; मृत्युदर वाढतोय

Next

मुंबई : देशातील वायुप्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. वाढते प्रदूषण आणि जागतिक तापमान वाढीमुळे ओझोनचा थरही घटत आहे. घटत्या ओझोनच्या थरामुळे मृत्युदराच्या प्रमाणात वाढ होत असून, देशातील हे प्रमाण १ लाख ७ हजार ८०० एवढे नोंदवण्यात आले आहे.
जागतिक हवामानाविषयीचा २०१७ चा अहवाल (स्टेट आॅफ ग्लोबल एअर २०१७) नुकतेच बोस्टनमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. अहवालानुसार, प्रदूषित हवेमुळे होणाऱ्या अकाली मृत्यूच्या प्रमाणात कमालीची वाढ झाली आहे. ओझोन प्रदूषणामुळे होणाऱ्या अकाली मृत्यूंमध्ये भारत पहिल्या स्थानावर आहे. हवेच्या प्रदूषणापेक्षाही ओझोन प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. ओझोन प्रदूषणामुळे जगभरात झालेल्या मृत्यूची २०१५ मधील आकडेवारी २ लाख ५४ हजार आहे. जगभरात हवेच्या प्रदूषणामुळे ४.२ दशलक्षपेक्षाही अधिक अकाली मृत्यूची नोंद २०१५ साली झाली आहे. जगातील एकूण लोकसंख्येच्या ९२ टक्के लोकसंख्या प्रदूषित हवेत वास्तव्य करते. हवेच्या प्रदूषणामुळे होणाऱ्या जगभरातील अकाली मृत्यूच्या अर्ध्या प्रमाणासाठी (५२ टक्के) भारत आणि चीन हे दोन जबाबदार आहेत. मुंबई शहर व उपनगरांत मोटारींमुळे दररोज तब्बल ९०० टन वायुप्रदूषण होत आहे. दुर्दैव म्हणजे उद्योग आणि वाहने हे दोन घटक वायुप्रदूषणात सातत्याने भर घालत असून, त्यातील ८० टक्के प्रदूषण हे मोटारींमुळे होत आहे. शिवाय पेटत्या डम्पिंग ग्राउंडची यात भर पडत आहे. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणांवरील धुलीकण मुंबईच्या वातावरणात मिसळत असल्याचे यातून समोर आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Ozone layer is decreasing; Death rates are rising

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.