एक्स्प्रेस-वेच्या प्रकल्पबाधितांना घसघशीत पॅकेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2016 07:06 AM2016-08-18T07:06:04+5:302016-08-18T07:06:04+5:30

नागपूर-मुंबई ७१० किलोमीटर अंतराच्या ‘समृद्धी’ महामार्गासाठी (कम्युनिकेशन सुपर एक्स्प्रेस-वे) भूसंपादनाचे पॅकेज राज्य शासनाने निश्चित केले असून लवकरच भूसंपादनाला सुरुवात

Package-related exposure to Express-Way | एक्स्प्रेस-वेच्या प्रकल्पबाधितांना घसघशीत पॅकेज

एक्स्प्रेस-वेच्या प्रकल्पबाधितांना घसघशीत पॅकेज

Next

- यदु जोशी, मुंबई

मुंबई : नागपूर-मुंबई ७१० किलोमीटर अंतराच्या ‘समृद्धी’ महामार्गासाठी (कम्युनिकेशन सुपर एक्स्प्रेस-वे) भूसंपादनाचे पॅकेज राज्य शासनाने निश्चित केले असून लवकरच भूसंपादनाला सुरुवात होणार आहे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या मालकीची पर्यायी जमीन आणि १० वर्षांपर्यंत वाढीव अनुदानाची हमी शासनाने दिली आहे.
जमिनीच्या मोबदल्यात जमीन आणि वर अनुदान, असा हा फॉर्म्युला आहे. संपादित केलेल्या जमिनीचा भाव वाढला नाही तर जमीन परत विकत घेण्याची हमी शासनाने दिली आहे. तेही आजच्या रजिस्ट्रीच्या दर एकरी दराच्या पावणेचार पट रक्कम गृहीत धरुन त्यावर दरसाल दरशेकडा ९ टक्के व्याजाने १० वर्षांनंतर जी रक्कम येईल त्या रकमेला. मोबदला एकरकमी मिळेल.
या महामार्गावर २३ कृषी समृद्धी केंद्रे उभारण्यात येणार आहेत. हे एक हजार एकरातील नवीन नगर असेल. कृषी उद्योगाच्या अत्याधुनिक सुविधा त्या ठिकाणी असतील. प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांना मोफत औद्योगिक प्रशिक्षण दिले जाईल. मोठ्या बाजारपेठेशी जोडणारी व्यवस्था उपलब्ध होईल. शाळा, कॉलेज, दवाखाने, पोलीस ठाणे, टपाल कार्यालय, वाहतूक आदी सोयी मिळतील. मोठे रस्ते, सांडपाणी व्यवस्थापन, मुबलक पाणी, वीज, बागा, क्रीडांगणे, उद्योग, सेवा, हॉटेल्स, बाजारपेठा, दुकाने, पेट्रोल पंप, शीतगृह, वखारी, शेतीमाल प्रक्रिया केंद्रे, फळ प्रक्रिया केंद्रे, गुरांचे दवाखाने आदी सुविधा असतील. बचतगटांना प्रोत्साहन दिले जाईल. रोजगाराच्या मोठ्या संधी चालून येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लोकमतला सांगितले.

प्रकल्पग्रस्तांची समृद्धी हा माझा शब्द
नागपूर-मुंबई कम्युनिकेशन सुपर एक्स्प्रेस-वेसाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना पर्यायी जमिनीची मालकी आणि दहा वर्षांपर्यंत अनुदान देऊन त्यांची समृद्धी साधली जाईल, हा माझा प्रकल्पग्रस्तांना दिलेला शब्द असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
शासन प्रकल्पग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांच्या संपूर्ण आयुष्याची काळजी नक्कीच घेणार आहोत. विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांची समृद्धी या महामार्गाद्वारे साधली जाईल. कृषी-उद्योग मालाच्या साठवणुकीसाठी गोदामे आणि कोल्डचेन उभारली जाईल.

प्रकल्पासाठी दिलेल्या जमिनीचा मोबदला
प्रकल्पात दिलेली शेतजमीनविकसित शहरात भूखंड
एक एकर (४३५६० चौ.फूट) १०८९० चौ.फूट (२५%)
एक एकर (४३५६० चौ.फूट) १३०७८ चौ.फूट (३०%)

उत्पादनाच्या मोबदल्यात काय मिळणार?
दिलेली जमीन दरसाल अनुदानवार्षिक वाढ १० वर्षांच्या शेवटी
एक एकर जिरायत २०००० रु. १०% २९००००रु. एकूण रक्कम
एक एकर बागायत ४०००० रु. १०% ५८००००रु. एकूण रक्कम

Web Title: Package-related exposure to Express-Way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.