अडचणीतील सहकारी बँकांना १,४०० कोटींचे पॅकेज

By admin | Published: April 19, 2015 01:43 AM2015-04-19T01:43:02+5:302015-04-19T01:43:02+5:30

राज्यातील डबघाईला आलेल्या बँकांचे पुनरुज्जीवन व त्यांना ऊर्जितावस्था आणण्यासाठी १,४०० कोटी रुपयांचे पॅकेज देण्याचा विचार आहे,

Package of Rs 1,400 Crore to Concerned Co-operative Banks | अडचणीतील सहकारी बँकांना १,४०० कोटींचे पॅकेज

अडचणीतील सहकारी बँकांना १,४०० कोटींचे पॅकेज

Next

कोल्हापूर : राज्यातील डबघाईला आलेल्या बँकांचे पुनरुज्जीवन व त्यांना ऊर्जितावस्था आणण्यासाठी १,४०० कोटी रुपयांचे पॅकेज देण्याचा विचार आहे, अशी माहिती सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी येथे दिली.
पुणे येथील सहकार भारती मुखपत्र सुगंध स्पर्धेचा निकाल व पारितोषिक वितरणप्रसंगी ते बोलत होते. राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, नॅशनल डेअरी फेडरेशनचे अध्यक्ष सुभाष मांडगे, ‘सहकार भारती’चे राष्ट्रीय सचिव डॉ. उदय जोशी प्रमुख पाहुणे होते.
बँकांना प्राप्तिकरातून सवलत देण्यात येणार आहे. सहकार विभाग गतिमान करण्यासाठी लवकरच संगणकीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे जनतेचा वेळ, श्रम आणि पैसा वाचेल. सहकार उपनिबंधक ते सचिव पदापर्यंतच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
‘सहकार भारती’चे काम चांगले आहे. सहकार क्षेत्राची सद्य:स्थिती पाहिली तर पतसंस्था, बँका आर्थिक डबघाईला येण्यास संचालकांचे नातेवाईक कारणीभूत ठरत आहेत. त्यांना भरमसाट कर्जे दिल्याने संस्थांची पडझड झाली, असे पाटील म्हणाले. ज्या पतसंस्था, बँकांना ‘अ’ वर्ग मिळाला आहे, त्यांनाच ‘सहकार सुगंध’ पुरस्कार पुढील वर्षापासून द्यावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

च्बँकांना प्राप्तिकरातून सवलत देण्यात येणार आहे.
च्पतसंस्था, बँका आर्थिक डबघाईला येण्यास संचालकांचे नातेवाईक कारणीभूत ठरत आहेत.

Web Title: Package of Rs 1,400 Crore to Concerned Co-operative Banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.