माळीणमध्ये पक्का भराव ओतणार
By admin | Published: June 27, 2017 01:59 AM2017-06-27T01:59:58+5:302017-06-27T01:59:58+5:30
पुनर्वसित माळीण गावात पहिल्याच पावसात झालेल्या पडझडीनंतर प्रशासन खडबडून जागे झाले. दिवसभर सार्वजनिक बांधकाम
लोकमत न्यूज नेटवर्क
घोडेगाव (पुणे) : पुनर्वसित माळीण गावात पहिल्याच पावसात झालेल्या पडझडीनंतर प्रशासन खडबडून जागे झाले. दिवसभर सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभागाने वाहून गेलेले रस्ते, गटारी व विजेचे खांब उभे करण्याचे काम सुरू केले. खचलेल्या भरावावर दगडांचा पक्का भराव करुन ते सुरक्षित करण्यात येणार आहेत.
माळीण दुर्घटनेच्या ठिकाणचे नुकसान व उपाय योजनांसाठी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधीक्षक अभियंता आर. एस. रहाणे, कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, पुणे यांचे प्राध्यापक भालचंद्र बिराजदार, वास्तुविशारद मोहन साकळकर, तहसीलदार रवींद्र सबनीस हे सकाळपासून माळीणमध्ये तळ ठोकून होते. खचलेले रस्ते भराव टाकून दुरुस्त करण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला. जिल्हा परिषद शाळेमागील भरावावर दगडांचे पिंचिंग केले जाणार असल्याचे उपअभियमता एल. डी. डाके यांनी सांगितले.