मुलीच्या जन्मानंतर पावणेदोन मिनिटात ‘आधार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 01:15 AM2018-04-26T01:15:18+5:302018-04-26T01:15:18+5:30
मुलीच्या जन्मानंतर आकाश अग्रवाल यांनी मुलीच्या आधार कार्डसाठी नोंदणी केली.
खामगाव (बुलडाणा) : मुलीच्या जन्मानंतर अवघ्या पावणेदोन तिचे आधार कार्ड काढून खामगाव येथील अग्रवाल कुटुंबीयांनी आगळा विक्रम केला आहे. यापूर्वी उस्मानाबाद येथे सहा मिनिटांत आधार कार्ड काढले गेले आहे.
खामगाव येथील आकाश अग्रवाल यांच्या पत्नी शिल्पा अग्रवाल यांना प्रसूतीसाठी जलंब रोडवरील एका हॉस्पिटलमध्ये १८ एप्रिल २०१८ रोजी पहाटे ५:३० वाजता भरती करण्यात आले. सकाळी ८ वाजून ७ मिनिटांनी त्यांनी मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर आकाश अग्रवाल यांनी मुलीच्या आधार कार्डसाठी नोंदणी केली. ही नोंदणी केल्यानंतर अग्रवाल यांच्या साची नामक अपत्याला १ मिनिट ४८ सेकंदात आधार कार्ड मिळाले आहे. यापूर्वी जन्मानंतर सहा मिनिटांमध्ये आधार कार्ड काढण्याचा विक्रम उस्मानाबाद येथील भावना संतोष जाधव या मुलीच्या नावावर आहे.
ताबडतोब मिळाले आधारकार्ड!
जन्मानंतर अवघ्या पावणेदोन मिनिटांमध्ये आधार कार्डासाठी नोंदणी करणाऱ्या साचीला यूआयडीएआयकडून त्वरित आधारकार्ड देण्यात आले आहे. जन्माला येताच मुलीने एका नव्या विक्रमाला गवसणी घातल्यामुळे अग्रवाल कुटुंबीयांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.