साहित्यिक नामदेव कांबळे यांना पद्मश्री पुरस्कार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 10:36 PM2021-01-25T22:36:44+5:302021-01-25T22:37:44+5:30

Padmashri award News नामदेव कांबळे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

Padma Shri award to Namdev Kamble! | साहित्यिक नामदेव कांबळे यांना पद्मश्री पुरस्कार!

साहित्यिक नामदेव कांबळे यांना पद्मश्री पुरस्कार!

googlenewsNext

वाशिम : वाशिम येथील प्रसिद्ध साहित्यिक, कवी, ना.चं. या नावाने ओळखले जाणारे नामदेव चंद्रभान कांबळे यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सन्मानाचा पद्मश्री पुरस्कार (साहित्य) जाहीर झाला आणि वाशिमसह विदर्भातील साहित्य क्षेत्र देशाच्या नकाशावर झळकले.

१ जानेवारी १९४८ रोजी शिरपूर (ता. मालेगाव) येथे ना.चं. कांबळे यांचा जन्म झाला. चार भाऊ व तीन बहिणी यामध्ये ना.चं. यांचा सहावा क्रमांक लागतो. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण शिरपूर येथे झाले तर बारावीनंतर वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएसला प्रवेश मिळाल्यानंतर प्रथम वर्षातच त्यांना अपयश आले. या नैराश्येतून साहित्य क्षेत्राकडे वळलेले ना.चं. कांबळे यांनी त्यानंतर मागे वळून पाहिले नाही. उदरनिर्वाहासाठी चौकीदार, खासगी शाळेत वॉचमन अशी कामेही त्यांनी केली. बी.ए., बी.एड. शिक्षण झालेले असल्याने १९७७ मध्ये वाशिम येथील राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. दरम्यान, कादंबरी, कविता, साहित्य लिखाण सुरूच ठेवले. ‘राघववेळ’ ही त्यांची सर्वात गाजलेली कादंबरी. याच कादंबरीला १९९५ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. याच कादंबरीला ह.ना. आपटे, बा.सी. मर्ढेकर व ग.त्र्यं. माडखोलकर पारितोषिकही मिळाले आहे. आठ कादंबऱ्या, तीन कथासंग्रह, चार कवितासंग्रह, ललित लेख असे साहित्य क्षेत्रातील विविध पैलू हाताळत ना.चं. यांनी विविध पुरस्कार खेचून आणले. साहित्य क्षेत्रातील या कामगिरीची दखल घेत २५ जानेवारी रोजी त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. या पुरस्काराने वाशिमच्या साहित्य जगतात मानाचा तुरा खोवला असून, ना.चं. कांबळे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 

ना.चं. कांबळे यांचा अल्प परिचय
जन्म नाव : नामदेव चंद्रभान कांबळे
टोपण नाव : ना.चं.
जन्म : १ जानेवारी १९४८

जन्मस्थळ : शिरपूर, ता. मालेगाव, जि. वाशीम
कार्यक्षेत्र : शिक्षक, साहित्यकार, समाजसेवक
 

यापूर्वी मिळालेले पुरस्कार
साहित्य अकादमी पुरस्कार १९९५ - ‘राघववेळ’साठी
ह.ना. आपटे पारितोषिक - ‘राघववेळ’साठी

बा.सी. मर्ढेकर पारितोषिक - ‘राघव वेळ’साठी
ग.त्र्यं. माडखोलकर पारितोषिक -‘राघववेळ’साठी

वि.स. खांडेकर पारितोषिक १९९८ - ‘ऊन सावली’साठी

विविध संस्थांचे पुरस्कार- ‘राघववेळ’, ‘ऊन सावली’, ‘सांजरंग’, ‘मोराचे पाय’, ‘कृष्णार्पण’
राघववेळचा बंगाली अनुवाद- ‘रघबेर दिनरात’ (२००९) मध्ये प्रकाशित -तिला २०११-१२ चा साहित्य अकादमी

राज्य पुरस्कार ‘राघववेळ’(१९९४), ‘ऊन सावली’(१९९६)

वैयक्तिक पुरस्कार- संत गाडगे बाबा समरसता पुरस्कार, सामाजिक एकता पुरस्कार, अण्णा भाऊ साठे पुरस्कार, समाजभूषण पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार २०१८.

Web Title: Padma Shri award to Namdev Kamble!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.