नैसर्गिक शेतीच्या जनकाला पद्मश्री!

By admin | Published: January 26, 2016 03:26 AM2016-01-26T03:26:45+5:302016-01-26T03:26:45+5:30

शेतीचे ‘झीरो बजेट’ मांडणारे, नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून शेकडो शेतकऱ्यांना अर्थसाक्षर करणारे शेतकरी व गांधीवादी कार्यकर्ते सुभाष पाळेकर यांच्या कार्याला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल

Padmashri father of natural farming | नैसर्गिक शेतीच्या जनकाला पद्मश्री!

नैसर्गिक शेतीच्या जनकाला पद्मश्री!

Next

मुंबई : शेतीचे ‘झीरो बजेट’ मांडणारे, नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून शेकडो शेतकऱ्यांना अर्थसाक्षर करणारे अमरावतीमधील बेलोरा येथील शेतकरी व गांधीवादी कार्यकर्ते सुभाष पाळेकर यांच्या कार्याला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.
१९४९मध्ये जन्मलेले पाळेकर हे कृषी पदवीधर असून, गेल्या ३५ वर्षांपासून ते शेतीचे ‘झीरो बजेट’ मांडून नैसर्गिक शेतीची चळवळ चालवित आहेत. आजवर राज्यातील हजारो शेतकऱ्यांना त्यांनी नैसर्गिक शेतीचे नि:शुल्क प्रशिक्षणही दिले आहे. शास्त्रीय मांडणीतून ते शेतीचे तत्त्वज्ञान सांगतात. रासायनिक खतांच्या वापराविना विषमुक्त शेतीचा ते प्रसार करीत आहेत. पद्म पुरस्कार जाहीर झाला, तेव्हा पाळेकर हे रात्री उशिरापर्यंत आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात व्यस्त होते. शेतकरी, कृषीतज्ज्ञ, प्रशिक्षक अशा विविध भूमिका ते सांभाळत आहेत.

Web Title: Padmashri father of natural farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.