पेड न्यूज प्रकरण - अशोक चव्हाणांची याचिका फेटाळली

By admin | Published: May 5, 2014 12:03 PM2014-05-05T12:03:35+5:302014-05-05T19:21:08+5:30

पेडन्यूज प्रकरणी अशोक चव्हाण यांना सुप्रीम कोर्टाने दणका दिला असून निवडणूक आयोगाला पेड न्यूज प्रकरणात सुनावणीचा अधिकार आहे असे स्पष्ट करत सुप्रीम कोर्टाने अशोक चव्हाणांची याचिका फेटाळून लावली आहे.

Paid News Case - Ashok Chavan's plea rejected | पेड न्यूज प्रकरण - अशोक चव्हाणांची याचिका फेटाळली

पेड न्यूज प्रकरण - अशोक चव्हाणांची याचिका फेटाळली

Next

 ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ५ - पेडन्यूज प्रकरणी अशोक चव्हाण यांना सुप्रीम कोर्टाने दणका दिला असून निवडणूक आयोगाला पेड न्यूज प्रकरणात सुनावणीचा अधिकार आहे असे स्पष्ट करत सुप्रीम कोर्टाने अशोक चव्हाणांची याचिका फेटाळून लावली आहे. निवडणूक आयोगाने आगामी ४५ दिवसांत या प्रकरणाचा निकाल द्यावा असे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. 
चार वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काही वृत्तपत्रांमध्ये पेड न्यूज छापून आणल्या होत्या. या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रारही दाखल करण्यात आली होती. मात्र निवडणूक आयोगाला या संदर्भात कारवाईचे अधिकार नसल्याचा दावा करत अशोक चव्हाण यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सोमवारी सुप्रीम कोर्टात या याचिकेवर सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने अशोक चव्हाणांची याचिका फेटाळून लावतानाच निवडणूक आयोगालाच पेड न्यूज संदर्भात कारवाई करण्याचे अधिकार आहेत असे स्पष्ट मत कोर्टाने मांडले. पेड न्यूजसंदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेला अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे.

Web Title: Paid News Case - Ashok Chavan's plea rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.