मुंबई हल्यात आयएसआयचा हात असल्याची पाकिस्तानी अधिका-याने दिली होती कबुली

By admin | Published: February 23, 2016 04:46 PM2016-02-23T16:46:16+5:302016-02-23T16:46:16+5:30

मुंबई 26/11 दहशतवादी हल्यामध्ये पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचा हात असल्याची कबुली पाकिस्तानचे माजी आणि तेव्हाचे प्रमुख अहमद शुजा पाशा यांनी दिली होती

A Pakistani official acknowledged that the ISI was in the hands of Mumbai | मुंबई हल्यात आयएसआयचा हात असल्याची पाकिस्तानी अधिका-याने दिली होती कबुली

मुंबई हल्यात आयएसआयचा हात असल्याची पाकिस्तानी अधिका-याने दिली होती कबुली

Next
>ऑनलाइन लोकमत -
वॉशिंग्टन, दि. 23 - मुंबई 26/11 दहशतवादी हल्यामध्ये पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचा हात असल्याची कबुली पाकिस्तानचे माजी आणि तेव्हाचे प्रमुख अहमद शुजा पाशा यांनी दिली होती. अमेरिकी गुप्तचर संस्थेचे (सीआयए) माजी प्रमुख मायकल हेडन यांनी आपल्या पुस्तकात ही माहिती दिली आहे. मुंबई हल्यातील दहशतवाद्यांना पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या काही निवृत्त अधिका-यांनी प्रशिक्षण दिलं होतं, आणि हे माहित असूनदेखील कारवाई करण्यास मात्र अहमद शुजा पाशा यांनी नकार दिला होता. 
 
मायकल हेडन यांनी आपल्या 'प्लेइंग टू द एज' या पुस्तकात हा गौप्यस्फोट केला आहे. मायकल हेडन 2009 पर्यंत अमेरिकी गुप्तचर संस्थेच्या प्रमुखपदी होते. मायकल हेडन यांनी त्यावेळी अहमद शुजा पाशा यांच्याशी फोनवरुन बातचीत केली होती आणि या हल्याची अगदी खोलपर्यंत जाऊन माहिती काढून आमच्याशी चर्चा कऱण्यास सांगितल होतं. 
अहमद शुजा पाशा ख्रिस्मससाठी अमरिकेत गेले असता मायकल हेडन यांच्या कार्यालयात थांबले होते. अहमद शुजा पाशा यांनी केलेल्या चौकशीत मुंबई हल्यात आयएसआयच्या माजी सदस्यांचा सहभाग असल्याचं समोर आलं होतं. आयएसआयच्या काही निवृ्त्त सदस्यांनी या दहशतवाद्यांनी प्रशिक्षण दिल असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली होती. मात्र दहशतवाद्यांना हल्यासाठी पाकिस्तानातून फोनवरुन मिळणा-या सुचनांबाबात त्यांनी स्पष्ट माहिती नाही दिली असं पुस्तकात सांगण्यात आले आहे.
 
पाकिस्तानी नेतृत्व दहशतवाद्यांशी कारवाई करण्याची वेळ आली की दुटप्पी भुमिका घेते. अलकायदा, लष्कर ए तोयबा, तालिबान यासारख्या दहशतवादी संघटनांवर पाकिस्तान कारवाई करत नसल्याचं म्हणत मायकल हेडन यांनी या पुस्तकात आपली निराशा व्यक्त केली आहे. पाकिस्तानी लष्कराला दहशतवाद्यांविरोधात लढण्यासाठी तयार करण्याऐवजी भारताविरोधात लढण्यासाठी तयार केलं जात आहे. पाकिस्तानी नेतृत्व ज्यांची लष्कराची पार्श्वभुमी आहे ते नेहमीच आदिवासी भागातील दहशतवाद्यांशी लढण्यात नेहमीच अपयशी राहिले आहेत असंही या पुस्तकात लिहिले आहे. 

Web Title: A Pakistani official acknowledged that the ISI was in the hands of Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.